कुडो मिक्स मार्शल आर्ट अकँडमी चा भव्य शुभारंभ.
परतूर / प्रतिनिधी. हनुमंत दवंडे
परतूर येथील जिल्हा परिषद प्रशाळा येथे दि.०१/०९/२०२२,रोजी कुडो मिक्स मार्शल आर्ट अकँडमी मेंबर आँफ कुडो असोसिएशन महाराष्ट्र चा भव्य शुभारंभ कार्यक्रम घेण्यात आला.कुडो मिक्स मार्शल आर्ट चे विध्यार्थ्यांना होनारे फायदे.महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी उपयोग होतो,इयत्ता १० वि व १२ वि च्या विध्यार्थ्यांना परिक्षेत २५ ग्रेस गुणांचा लाभ,भारत सरकार व्दारा मान्यता प्राप्त विविध विभागासह केंद्र व राज्य शासनाच्या शासकिय व निमशासकीय नोकरी भरती प्रक्रियेत ५% आरक्षणाचा लाभ,स्कूल व काँलेज प्रवेश प्रक्रियेत खेळाडू कोटयामध्ये सरळ प्रवेश,राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंला शिष्यवृत्ती .या सर्व सुविधा आसतानी आजच्या युगात सेल्फ डिफेन्स शीकने अत्यावश्यक आहे. म्हणून परतूर येथे नव्याने सुरुवात होत आहे. यावेळी 2डँन ब्लॅक बेल्ट दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित जैस्वाल यांनी कुडो मार्शल आर्ट ची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमा चे अध्यक्ष उपविभागीय पो.अधिकारी, राजु मोरे, प्रमुख उपस्थिती, पो.निरिक्षक, शामसुंदर कौठाळे, चित्रक,मा.नगराध्यक्ष, मार्गदर्शक, मंदाताई लोणीकर,मा.तनपुरे मँडम,प्रमुख अतिथी, महेश नळगे,सुभोद चव्हाण, शुभम तेलगड, शाम तेलगड, गंगाधर पवार, मुख्यध्यापक, विष्णू कदम,भांडवलकर सर,लिंगनवार सर, राजेंद्र मुंदडा, गणेश नळगे, पत्रकार,कैलास सोळंके, अजय देसाई, डॉ.सत्यानंद कराड,डॉ.राजगोपाल तापडीया. विध्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.