तळणी महसूल मंडलाचा अतिवृष्टी भाग म्हणून घोषित करावा - कैलाश सरकटे
मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
दि.१३ मंठा तालुक्यातील तळणी महसूल मंडळात सतत होणाऱ्या संततधार पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे.
यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस,मुग,उडीद या पिकाचा शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. तरी शासनाने याची वेळीच दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच बहुतांश ठिकाणी नुकसान झाल्यामुळे पंचनामे करणे शक्य नसल्यास सर्व तळणी मंडळाचा भाग अतिवृष्टी मध्ये समाविष्ट करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कैलासराव सरकटे यांनी मंठा तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.