हिंदु धर्माचे काम वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करणार: सिद्धेश्वर काकडे
जालना समाधान खरात
हिंदु धर्माचे काम वाढुऊन प्रभु. श्रीरामाच्या आशीर्वादाने भगव्याची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मनसे विद्यार्थी सेना नेते तथा श्री राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. जिथे जिथे हिंदु धर्माचे देव देवस्थानं व तीर्थ क्षेत्र आहेत. तिथे भेटी देऊन मंदिराची आनेक ठिकाणी बिकट झालेली अवस्था चांगल्या प्रकारे करून धर्म कार्य वाढवणार असल्याचे मनसे विद्यार्थी सेना नेते तथा श्री.राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. यासाठी लागणारा निधी आपण उभा करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले आहे.
हिंदु धर्माचे कार्य हे आता वाढवण्याची वेळ आलेली असून प्रत्येकाने धर्म कार्यात आपला वेळ देणे गरजेचे असून जर हे काम नाही वाढवलं तर? पुढील दिशा गंभीर अासेल म्हणून राजकारण बाजूला करत सर्वांनीच हिंदु धर्म कार्यात वाटा घेतला पाहिजे असे मत श्री.राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष तथा मनसे विद्यार्थी सेना नेते सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केले आहे. आपण आपल्या धर्माचे काम वाढवत असताना ईतर धर्माला विनाकारण त्रास होणार नाही. याचीही आम्ही काळजी घेऊ असे मत काकडे यांनी व्यक्त केले आहे.