नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वात कणखर पंतप्रधान - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर ,खर्च टाळून सेवा समर्पण पंधरवाडा साजरा करा - लोणीकरांचे आवाहन,सेवा समर्पण पंधरवाडा निमित्त लोणीकरांच्या हस्ते अस्थिव्यंग विद्यालयात ब्लॅंकेट शालेय साहित्य व फळ वाटप तर नानसी पुनर्वसन येथे वृक्ष लागवड

मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
देशातील सर्वसामान्य जनतेसाठी व राष्ट्रकार्यासाठी दिलेले आजपर्यंतचे अमुल्य व आदर्शवत असे योगदान देणारे देशाचे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांचे नाव डोळ्यासमोर येते त्यांच्या नावाचा, कार्याचा आणि राष्ट्रभक्तीचा राष्ट्रपती समर्पण भावाचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतापर्यंतच्या पंतप्रधानांच्या तुलनेत सर्वात कणखर पंतप्रधान आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
मंठा येथील कै रामराव कान्हेरकर निवासी अस्थिव्यंग विद्यालय येथे सेवा समर्पण पंधरवाडा निमित्त आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टी मंठा तालुक्याच्या वतीने ब्लॅंकेट वाटप, शालेय साहित्य वाटप तसेच फळ वाटप करण्यात आले यावेळी गणेशराव खवणे, संदीप भैया गोरे, तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ, पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, नागेशराव घारे, प्रसादराव गडदे, नाथराव काकडे, प्रल्हादराव बोराडे प्रसादराव बोराडे, विठ्ठल मामा काळे, सुभाष राठोड, कैलास बापू बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशात आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाचा वाढदिवस सेवा समर्पण सप्ताह किंवा सेवा समर्पण पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला नाही पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र दरवर्षी आपला वाढदिवस सीमेवरील जवानांच्या सोबत किंवा सर्वसामान्य जनतेच्या सेवेत साजरा केला असून आपणही कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च न करता सेवा समर्पण पंधरवाडा साजरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात भाजपतर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व उपकरण यांचे वितरण करणे, प्रत्येक जिल्ह्यातील गरीब वस्ती, अनाथाश्रम, रुग्णालये व वृद्धाश्रमांना भेट देऊन फळांचे वाटप करणे, जिल्हा/विभाग स्तरावर आरोग्य तपासणी शिबीर, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप, रक्तदान शिबीर इत्यादी कार्यक्रम राबविले जातील. यामध्ये, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, योगा कार्यक्रम, रक्तदान शिबिर,माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या दीर्घआयुष्याकरिता मंदिरांमध्ये पूजा-अर्चना कार्यक्रम, देशगौरव नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विविध योजनांची माहिती, गरजूंना धान्य किट वाटप, निराधारांचा सन्मान, दिव्यांगाच्या सन्मान, चहा स्टॉल धारकांचा सन्मान, गीत गायन स्पर्धा, कविता स्पर्धा, अशा विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन मतदार संघात करण्यात आले आहे. असेही लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

एखाद्या पंतप्रधानाच्या वाढदिवसानिमित्ताने एवढा भरगच्च कार्यक्रम सप्ताह किंवा पंधरवाडा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केला जातो ही बाब आपणास सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची असून नरेंद्र मोदी जी यांच्यासारखा कणखर आणि राष्ट्रभक्त पंतप्रधान आपणा सर्वांना मिळाला याचा आपल्याला अभिमान आहे मोदीजींनी सुरू केलेल्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा समर्पण पंधरवाडा या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील यावेळी लोणीकर यांनी केले.

*नानसी पुनर्वसन येथे वृक्ष लागवड*
देशाचे महामहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मंठा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नानसी पुनर्वसन येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असून जगाला ऑक्सिजन पुरवठा करणारे ५१ प्रकारचे वृक्ष मतदारसंघासह संपूर्ण देशभरात लावले गेले पाहिजेत असेही यावेळी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपले मत व्यक्त केले

यावेळी मुस्तफा पठाण, दारासिंग चव्हाण, एनडी दवने, निवास देशमुख,नितीन सरकटे, विलास घोडके,शरद पाटील, महेश पवार कैलास चव्हाण, विठ्ठलराव कदम सोपानराव खरात अनंता वैद्य, राजेभाऊ नरवडे डी.एम घनवट पतंगे, एन.बी देशपांडे, व्ही एस चव्हाण, आकाश कुलदीप, पी डी कुलकर्णी, एमबी देशमुख, अमोल घावे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....