रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने रमेश कुडे सन्मानित
मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
दि. १८ मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हेलस येथील मुख्याध्यापक श्री.आर.बी.कुडे यांना त्यांचे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात गोडी निर्माण करणारे, विद्यार्थी प्रिय, तालुक्यामध्ये शिस्तप्रिय म्हणून अशी ओळख असणारे व त्यांनी केलेल्या राष्ट्रीय कार्याबद्दल रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. डीडी विसपुते महाविद्यालय विचुंबे, पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी श्री महेंद्र विसपुते यांचे अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. प्रसंगी श्रीमती मनीषा पवार मॅडम शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग .श्रीमती पालकर मॅडम उपशिक्षणाधिकारी रायगड .श्री राजेश सुर्वे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष,श्री शाहू भारती संपादक दैनिक रयतेचा कैवारी व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मंठा शहरांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व नातेवाईक,मित्रपरिवार त्यांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.