चमन चा राजा या गणेश मंडळांनी सादर केला बाबा अमरनाथ यांचा देखावा
जालना प्रतिनीधी समाधान खरात
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व सणासुद शांततेत साजरी करण्यात आले होते परंतु यावर्षी महाराष्ट्र सरकारने सर्व सणासुदीवर कुठलेही निर्बंध न ठेवता सर्व सण जोरात साजरी करण्याच्या निर्णयामुळे यंदा गणपती उत्सव सर्व कडे जोरात साजरा करताना दिसत आहे
जालना येथील चमन चा राजा गणेश मंडळ दरवर्षीच नेहमीच विविध देखावे सादर करीत असते यावर्षी अमरनाथ यांचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आला हा बघण्याकरिता नागरिकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहेत चमनचा राजा या गणेश मंडळाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक हे भेट देत आहेत यामध्ये उद्योजक अरुण लाहोटी व दैनिक आनंद नगरीचे संपादक रवींद्र बांगड यांनी संपत्नी कुटुंबासह भेट दिली असता त्यांचा बाबा अमरनाथ यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आले होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जावळे उपाध्यक्ष राम पाटील खांडे , डॉक्टर प्रवीण जाधव,सचिव अशोक पडूळ ,कोषाध्यक्ष प्रशांत मस्के ,मंगेश देशमुख, विक्रम आगलावे, निरंजन राग ,बाळू वानखेडे, दादा गाडे ,अतुल ढवळे उपस्थित होते