बबन दुलबाजी एक्कीलवाले यांचे निधन
परतूर हनुमंत दवंडे
येथील बबन दुलबाजी एक्कीलवाले यांचं अल्पशा आजाराने दि. १९ सप्टेंबर वार सोमवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्ष होतं. येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता एक्कीलवाले यांचे ते वडील होते.
त्यांच्यावर येथील वैकुंठधाम स्मशान भूमी येथे दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.