मंठ्यात कायदेविषयक शिबिर संपन्न..... प्रत्येकाने कायदेविषयी जागरूक असावे - न्या. सुर्यवंशी


मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
 दि ३० न्यायव्यवस्थेमध्ये कायद्याने महिलांना खूप मोठे अधिकार दिले आहेत, कायदा म्हणजे महिलांची ताकद आहे,म्हणून प्रत्येकाने कायद्याबद्दल जागरूक असले पाहिजे असे प्रतिपादन न्या.कु.सूर्यवंशी मॅडम यांनी केले. 
      तालुका विधी सेवा समिती मंठा व वकील संघ मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री जगदंबादेवी परिसरात कायदेविषयक शिबिराचे गुरुवार (ता.29)रोजी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर दिवाणी व व फौजदारी कनिष्ठ स्तर न्यायालयाच्या न्यायाधीश सूर्यवंशी मॅडम, सहन्यायाधीश शेख मॅडम, बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्या.सूर्यवंशी बोलत होत्या. महिलांवर अत्याचार होत असेल तर न्यायव्यवस्था आहे,त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असून या माध्यमातून महिलांना निश्चितपणे न्याय मिळतो. महिलांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, प्रत्येक महिलांनी मुलींना चांगले शिक्षण द्यावे, विचारातून समाजाची सुधारणा होते असे प्रतिपादन न्या.कु.सूर्यवंशी मॅडम यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहन्यायाधीश शेख मॅडम या मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा कायदा आहे, त्यांना मुले सांभाळत नसतील तर न्यायालयात अर्ज करता येऊ शकतो. जेष्ठ नागरिकांना पोटगी मिळण्याचे पूर्ण अधिकार आहेत. लोकांना कायद्याची माहिती असणे आवश्यक असल्याचे सहन्यायाधीश शेख मॅडम यांनी सांगितले. यावेळी ऍड.राजेश खरात यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांसाठी असलेल्या कायद्याच्या अधिकाराची माहिती त्यांनी सांगितली, महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत न्याय मागता येतो असे सांगितले तर ॲड.डी.एस. निंबाळकर यांनी कौटुंबिक हिंसाचाराविषयी माहिती सांगितली, महिलांवर अन्याय होत असेल तर कायद्यात संरक्षण मिळते असे मत व्यक्त केले. यावेळी वकील संघाचे ॲड. डी.एस.निंबाळकर,ॲड.आर डी खरात,ॲड. ए.ए. कुलकर्णी, ॲड.डी.एस.लिंबुळकर,ॲड. उमेश राठोड, ॲड.विनोद राठोड,ॲड. पठाण यांच्यासह आर आर कुलकर्णी, दिनेश जोशी, संजय कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. या कायदेविषयक शिबिरात महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....