सन ऑफ आंबेडकर ग्रुप परतुरच्या पाठपुराव्यामुळे वरफळ येथील निराधार कुटुंबास मिळाला मदतीचा हात



परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
           गेल्या तीन महिन्यांपूर्वी पहिल्या मुसळधार पावसामध्ये वरफळ येथील खंडागळे परिवार यांचं घर त्या मुसळधार पावसामध्ये पडल्याने त्यांच्या लहान मुलास गंभीर दुखापत झालेली होती ही बाब सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वरफळ येथील खंडागळे परिवार यांना भेट देऊन तसेच सर्व परतूर करांना एक मदतीचं आवाहन करून ती मदतपण त्या परिवारास सनी गायकवाड यांनी मिळवून दिली 
        खंडागळे परिवाराला शब्द दिला तुम्हाला शासकीय मदतपण लवकरात लवकर सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या पाठपुराव्यामुळे आम्ही मिळवून देऊ,आज राेजी दिनांक 30 सप्टेंबर त्यांना त्यांच्या मुलाला जी घरपडीमध्ये दुखापत झालती त्या दुखापती साठी आज खंडागळे परिवाराला सन ऑफ आंबेडकर ग्रुपचा पाठपुराव्यामुळे 12700 रुपयांचा धनादेश आज रोजी प्राप्त झाला तसेच सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांनी बोलतानाने असे सांगितले की त्यांचे जे घर पडलेल आहे त्या पडधडीचेही पैसे लवकरात लवकर सन ऑफ आंबेडकर ग्रुपच्या पाठपुराव्यामुळे मिळवून देण्याचा प्रयत्न करू तसेच सनी गायकवाड यांनी परतूर तहसिल येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार मॅडम रूपाजी चित्रक व पेशकर पवार साहेब तसेच सरकटे मॅडम यांचे आभार मानले धनादेश वाटप करता वेळेस साेबत सनी गायकवाड सय्यद साहेब महसुल पेशकर सरकटे मॅडम न.आ वि दत्ता लवंगरे पु.वि.क.आ आर्या खंडागळे रोहित मगर इत्यादी उपस्थित होते

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात