लंपी नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केल्या सूचना,लसीकरणासाठी निधीची उपलब्धता नसेल तर आमदार फंड किंवा जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी करणार पत्रव्यवहार




जालना प्रतिनिधी समाधान खरात 
 देशासह राज्यातील अनेक भागांमध्ये लंपी नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये दिसून येत असून यामुळे अनेक जनावरे दगावत आहेत हा संसर्गजन्य रोग असून विशेष करून गाईंमध्ये या रोगाचे प्रमाण वाढत असल्याने जालना जिल्ह्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कळविले आहे 
या संदर्भामध्ये माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की गोमाता आणि पशुधन वाचवण्याला प्राधान्य क्रम देणे गरजेचे असून यासंदर्भामध्ये आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून निधीची कमतरता असल्यास गरजेप्रमाणे आमदार फंड किंवा जिल्हा नियोजन मंडळातील निधी खर्चाची परवानगी घेणार असल्याचे म्हटले आहे या संदर्भात पुढे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की कोरोना काळामध्ये मास्क सॅनिटायझर व इतर उपयुक्त किटच्या खरेदीसाठी आमदार फंडामधून निधी खर्चाची परवानगी देण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर गोधन वाचवण्यासाठी व संपूर्ण लसीकरण करून घेणार असल्याचे आमदार लोणीकर यांनी म्हटले असून गोमाता ही आमच्यासाठी परम श्रद्धेय असून यासाठी आपण संपूर्ण प्रयत्न करू असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे
यासंदर्भामध्ये जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी श्री कांबळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्यातील रोगाच्या प्रादुर्भाव विषयी सविस्तर चर्चा करीत या संबंधातील उपाययोजनांचा आढावा घेतला
उपायोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पुढे म्हटले आहे की, या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक गाईंचा मृत्यू देशासह राज्यात होत असून या संदर्भामध्ये तात्काळ लसीकरण करत पशुपालकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हंटले असून जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त असणाऱ्या पशुचिकित्साला यामध्ये योग्य ते उपचार करण्यासाठी विशेष टीमचे गठन करून रचनात्मक लसीकरण मोहीम व लंपी रोग प्रादुर्भाव थांबवण्याच्या उपाययोजना पशुपालकांना शेतकऱ्यांना लक्षात आणून देणे गरजेचे असल्याचे म्हटले असून या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालत संबंधित यंत्रणेला पशु वैद्यकीय उपकेंद्रावर थांबण्याच्या सूचना द्याव्यात असेही आमदार लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे
पशुधन ही शेतकऱ्यांची संपत्ती असून या रोगराईच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये उपाययोजनामध्ये कुठलीही कुचराई न करण्याचे ही आमदार लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्याला दिलेल्या पत्रात म्हटले आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....