नेर येथील कौशल्याबाई लाहोटी यांचे नेत्रदान


नेर प्रतिनीधी सुभाष वायाळ
   जालना तालुक्यातील नेर सारख्या ग्रामिण भागात मरावे परि कीर्तीरुपी उरावे या उक्ती प्रमाणे येथील ९० वर्षीय जेष्ठ महिला नागरीक श्रीमती कौसल्याबाई रामेश्वर लाहोटी यांचे काल मरणोपरान्त यशस्वी नेत्रदान झाले.या घटनेचे सर्व स्तरातुन लाहोटी कुटुंबाचे कौतुक केले जात आहे. 
             दि.04/9/22 रोजी सूर्योदय चॅरिटेबल ट्रस्ट हिवर्डी
  यांच्यातर्फे नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यात आली होती. त्यावेळी कौसल्याबाई रामेश्वर लाहोटी वय 90 वर्षे यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. आज दि.21/9/22 रोजी त्यांचा हा संकल्प त्यांच्या नातू गौरव श्रीनिवास लाहोटी यांनी सूर्योदय चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष डॉ.लुंगाडे.एस. एस.यांच्या मदतीने सकाळी 2 वाजता फोन करून आजीला देवयाज्ञा झाली हे निश्चित केल्यानंतर पूर्ण केला. ग्रामीण भागातून सूर्योदय चॅरीटेबल ट्रस्ट हिवर्डी, यांच्या प्रयत्नातून प्रथमच नेत्रदान झालेले आहे. डॉ लुंगाडे यांनी लोकांना नेत्रदानासाठी संकल्प करण्याचे आव्हान केले.या कार्यासाठी श्री गजानन मुरलीधर उफाड, भूषण कुरकुटे, लाहोटी परिवार, व डॉ. गणेश राठोड व अभय करावा यांचे आभार डॉ. लुंगाडे यांनी मानले. नेत्रदानाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी श्री गणपती नेत्रालयातून डॉ.निमया कांबळे व सुरेश चिंताल यांची टीम सकाळी 4 ला नेर येथे हजर होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....