पोलीस क्रीडा सर्धेत अमलदार गणेश शिंदे यांनी पटकावले सुवर्ण पदक
जालना प्रतिनिधी समाधान खरात
औरंगाबाद येथे पोलीस क्रीडा स्पर्धेत वजन गटात सर्वाधिक वजन उचलून आष्टी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अमलदार गणेश शिंदे यांनी सहभागी होऊन जालना जिल्ह्याला सुवर्ण पदक पटकावून दिले आहे.
औरंगाबाद ग्रामीण येथे होत असलेल्या ३६ वी औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये जालना पोलीस दलातील परतूर तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अमलदार गणेश विठ्ठल शिंदे यांनी वेटलिफ्टिंग प्रकारात दि १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वजन गटात सर्वाधिक ११७ कीलो वजन उचलून प्रथम क्रमांक घेत जालना जिल्हाला सुवर्ण पदक पटकावून दिले. यासाठी जालना पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनासह जालना टीमचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, व खेळप्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय निर्मल यांचे मार्गदर्शन लाभले. जालना पोलीस दलाने सुवर्ण पदक पटकावल्याने जालना पोलीस दलाची मान उंचावली आहे. पोलीस अमलदार गणेश शिंदे यांनी सुवर्ण पदक पटकावून दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सपोनि रवींद्र ठाकरे, यांच्यासह पोलीस कर्मचारी मित्र परिवार नातेवाईक आदींनी कौतुक केले आहे.