माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर सह उघोगपती , वकील ,पत्रकार,डॉक्टर, राजकीय नेते यांची चमन चा राजा गणेश मंडळाला भेट==अमरनाथ धाम चा सुंदर देखावा बघून मंडळाच्या कार्यकर्त्यांची केले कौतूक
जालना प्रतिनीधी समाधान खरात
माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी जालना शहरातील चमनचा राजा गणेश मंडळ ला भेट दिली यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते श्री ची आरती करण्यात आली यांच्या सह दररोज वीवीध मान्यवरांची भेट संपादक रवीद्र बांगड,उद्योगपती अरुण लाहोटी,रीतेश मंत्री,माजी आ. अरवींद चव्हाण,सुनील आर्दड,
चमन चा राजा गणेश मंडळांनी यावर्षी अमरनाथ धामचा साकारलेला देखावा अतिशय उत्कृष्ट असा देखावा असून आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देणारा असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी याप्रसंगी सांगितले
चमन चा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्वच कार्यकारिणीतील सदस्य गेल्या अनेक दिवसापासून श्री आगमनानिमित्त तयारी करत होते त्यांनी केलेली तयारी उत्कृष्ट असून त्यांनी साकारलेला हा देखावा अप्रतिम असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले असून या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले
गेल्या दोन वर्षात कोविड काळामध्ये गणेश मंडळातील नवयुवकांना आपली कल्पकता दाखवता आली नव्हती मात्र यावेळी शिंदे फडणवीस सरकारने संपूर्ण निर्बंध हटवल्यामुळे युवकांमध्ये आनंद असून उत्साहाचे वातावरण आहे त्यामुळे युवकांनी एकत्रित येत अतिशय सुंदर असा देखावा तयार केल्याबद्दल या युवकांचे आमदार लोणीकर यांनी अभिनंदन केले असून जालन्याच्या सांस्कृतिक ओळखीमध्ये चमन चा राजा गणेश मंडळ गेल्या कित्येक वर्षापासून अतिशय सुंदर देखावे जालना शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देत असतात मात्र यावेळी अप्रतिम असा देखावा जालन्यातील नागरिकांसाठी चमन चा राजा गणेश मंडळांनी उभारला असून हा देखावा पाहून निश्चितच मनाला आनंद झाल्याचे यावेळी आमदार लोणीकर यांनी सांगितले
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री विरेंद्र धोकाजी, रा.स.प.नेते ओमप्रकाश चितळकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रा सुजित जोगस, निवृत्ती डाके, मंडळाचे अध्यक्ष नंदू जावळे, उपाध्यक्ष रामा पाटील खांडे , सचिव अशोक, पडुळ कोषाध्यक्ष प्रशांत मस्के, सहसचिव विक्रम आगलावे, मंगेश देशमुख, दादा गाढे ,डॉ प्रवीण जाधव, जयप्रकाश देशमुख ,अतुल ढवळे, गजानन नागरे , आनंद पुंडलिकर, विक्रम आगटे, दीपक आगलावे, सचिन सातपुते , योगेश खरात , अमर जाधव , कैलास जैस्वाल हे उपस्थित होते..!!