कु. साक्षी बोरकरचा मनसे विधार्थी सेनेचे काकडे यांच्या कडून सत्कार
जालना प्रतिनिधी समाधान खरात
रिसोड (जि. वाशीम) तालुक्यातील वडजी येथील कु.साक्षी रमेश बोरकर या विद्यार्थीनीचे वडील मयत झाले असता. वडिलांचा मृतदेह घरामध्ये होता. व या विद्यार्थीनीचा इयत्ता १२ वी पेपर त्याच दिवशी होता.
या दुःखाच्या डोंगरात परीक्षाच्या दिवशी कु. साक्षी बोरकर हिने वडिलांचा मृतदेह घरामध्ये असताना आगोदर पेपर देऊन दिला व नंतर वडिलांच्या पार्थिवाला आग्निडाग दिला. संकटाचा सामना कसा? करावा हे उदाहरण कू. साक्षी हिने दिल्याचे दिसून आले आहे. या बद्दल या विद्यार्थिनीचे सामाजिक स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. ही बातमी मनसे विद्यार्थी सेना नेते तथा श्री राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर काकडे यांच्या कानावर पडली असताना त्यांनी वाशिल जिल्ह्यातील रिसोड येथे जाऊन गुणी विद्यार्थी साक्षी बोरकर हीची भेट घेऊन सत्कार करत अभिनंदन केले. या वेळी या विद्यार्थिनीने बँकिंग क्षेत्रात प्रगती करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांच्यासह खाजा भाई पठाण, विद्यार्थिनीचा भाऊ मयुर बोरकर, सचिव किशोर सपकाळ आदी उपस्थित होते.