माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या रेट्याने शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील स्ट्रीट लाईट झाले सुरू,परतुर साईबाबा मंदिर ते रेल्वे गेट परिसर झाला प्रकाशमय

परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
           आज परतुर शहरातील साईबाबा मंदिर परिसरापासून तर रेल्वे स्टेशन गेट पर्यंतचे शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील स्ट्रीट लाईट सुरू झाल्यामुळे परतुर शहर प्रकाशमान झाले असून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वेळोवेळी अध्यक्ष अभियंता कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार व भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील स्ट्रीट लाईट सुरू करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या होत्या
या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नवरात्रीच्या काळामध्ये स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून लवकरच तळणी वाटुर शिंगोना दैठणा आष्टी लोणी ते माजलगाव येथील स्ट्रीट लाईट सुरु होणार असून यामुळे विविध गावावरून ये जा करणाऱ्या पादचारी दुचाकी स्वार वाहन चालकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असून हे दिवे प्रकाशमान झाल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे
या संदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वेळोवेळी अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांना पत्र व्यवहार करत व भ्रमणध्वनी द्वारे तात्काळ पद दिवे सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या
या पार्श्वभूमीवर शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले असून लवकरच लोणार पासून ते माजलगाव पर्यंतचे सर्व स्ट्रीट लाईट सुरू केले जातील असे आमदार बबनराव लोणीकर यांनी या पत्रकात नमूद केले आहे

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात