शिवसेना मंठा शिंदे गट तालुकाप्रमुखपदी उदय बोराडे यांची नियुक्ती
मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
दि.०१ शिवसेनेच्या मंठा तालुकाप्रमुखपदी शिंदे गटाचे उदय प्रल्हादराव बोराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परतूर येथे नुकत्याच झालेल्या हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमात राज्याचे कृषिमंत्री ना.अब्दुल सत्तार, शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, भाऊसाहेब घुगे, पंडितराव भूतेकर, प्रल्हादराव बोराडे, यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
यावेळी मंठा शिवसेना शहर प्रमुख पदी गणेश रामराव बोराडे यांची निवड करण्यात आली. उदय बोराडे व गणेश बोराडे यांच्यासोबत तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला मंठा तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करून गावा गावात शिवसेनेचे कार्य मजबूत करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले प्रत्येक गावात त्यांचे विचार पोचविणार असल्याचे उदय बोराडे यांनी सांगितले.. उदय बोराडे यांना लहानपणापासूनच समाजसेवेची खूप आवड आहे त्यांनी 2012 सली शिवमुद्रा प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना करून तालुक्यात शाखाचां माध्यमातून सर्व अठरा पगड जातींच्या सर्व बांधवांना सोबत घेऊन सामाजिक कार्यात गेल्या 10 वर्षात तालुक्यात खूप कार्य केलेली आहेत व यासमोर ही सर्व शेतकरी बांधव असो सर्व क्षेत्रातील नागरिकांना माय बाप जाणते साठी 24 तास काम करेल.. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे