शेतक-यांना न्याय मिळेपर्यन्त स्वस्थ बसणार नाही मा.आ सुरेशकुमार जेथलिया मागण्या मान्य न झाल्यास दिवाळी नंतर विराट मोर्चा-नितीन जेथलिया
परतुर - प्रतिनिधी हनुमंत दवंडे
सर्वसामान्यांना प्रत्येक बाबतीत निराश करणारे हे सरकार सामान्यांचे नसुन शेतकऱ्यांना न्याय मिळे पर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी केले.
शेतक-यांच्या रखडलेल्या पिक विम्याबाबत व ओला दुष्काळ जाहिर करा या प्रमुख मागणीसह शेतक-यांच्या अनेक प्रश्नाबाबत आज दिनांक 18 आक्टोंबर रोजी काॅग्रेस कमिटीच्या वतिने काढण्यात आलेल्या मोर्चाला ते संबोधीत होते. यावेळी त्यांच्या समेवत अन्वर बापु देशमुख, नितीन जेथलिया, किसनराव मोरे, आर.के.खतिब, एकनाथ कदम, तालुकाअध्यक्ष बाबासाहेब गाडगे, निळकंठ वायाळ, जि.प.सदस्य इद्रजित घनवट, शिवाजी महाराज भेसले, शामसुंदर काळे, सुरेश सवणे, मंजुळदास सोळंके, सुखलाल राठोड, सुर्यभान मोरे, सादेख जाहिरदार, डाॅ.केशरखाने, लक्ष्मन शिंदे, माउली तनपुरे, बद्रीभाऊ खवणे, दिलीपराव चव्हाण, मनोज जाधव, बाळासाहेब अंभिरे, दत्ता पवार, अनिल अंबेकर, बाजीराव खरात, रोजेभाउ दांगट, गजाजनन पुंड, गोपाल मरळ, पाडुरंग कुरधने, भाउसाहेब जगताप, सययद राजु, मंजु देवकर, शिवा राठोड, अन्नासाहेब लिपणे, सचिन लिपने, गोपाल सोळके, शरद सोळंके, सुदंर मुळे, बाजीराव कातारे, शाकेर मापेगावकर, दादाराव खोसे, रावसाहेब काळदाते, आसाराम शेळके, हाजी रेहमत, अजिम कुरेशी, मोहसिन जमिनदार, अविनाश शाहणे, प्रविण डुकरे, बाबुराव हिवाळे, राजेश भुजबळ, रहिमो कुरेषी, अयुब कुरेशी, सादेख खतिब, अजिज सौदागर, मगेश डहाळे, तारेख सिददीकी, ओम कानडे, विठठल बागल, उध्दव वाघमारे,जगन दवणे,शे. रब्बानी,जुनेद कुरेशी, विलास राठोड, राजेश खंडेलवाल, तौफिक शेख,मनोज कऱ्हाळे, पांडूरंग गाडगे, जनार्धन काळे, माऊली तनपुरे, विष्णू तनपुरे,महिला अघाडीच्या सौ.राउत ,सौ राठोड सह शेकडो कार्याकर्तेची मोठया संखेने उपस्तीथी होती.
यावेळी पुढे बोलतांना मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले की, शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेण्याची मानसिकता या सरकार मध्ये नसुन पूर्वी महाअघाडीच्या काळात शेतक-यांचे व सामान्यांचे हित जोपासन्याचे कार्य आम्ही केले असल्याचे म्हणत, पिक विमा हक्काचा असताना त्याची वाट पाहावी लागते अशी खन्त त्यांनी व्यक्त केली पुढे बोलतांना त्यांनी म्हटले की, यंदा गत वर्षीच्या तुलनतेत दुप्पटीने पाउस झाल्याने कापसाचे , सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले असून तुटपुंजी मदत न करता सढळ हाताने मदत करणे आवश्यक आहे.तरीहि हे सरकार झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या मनोगतात केला. याबाबत जर असेचं चालु राहिले तर दिवाळी नंतर शेतक-यांच्य प्रश्नाबाबत आम्ही रस्त्यावर उतरत तीव्र अंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेवटी त्यांनी दिला.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात युवा नेते नितीन जेथलिया यांनी म्हटले की सरकार जर आपली जबाबदारी झटकत असेल तर त्याना जाब विचारायला हवा , आता याबाबत सर्वांनी पेटुन उढण्याची गरज असल्याचे म्हणत, मतदारसंघात अनेकांना मोठ मोठे पद मिळाले मात्र सत्तेचा व त्या पदाचा फायदा सामान्यांना व शेतक-यांना मिळत नसेल तर या पदांना चाटायचे काय असा सवाल त्यांनी उपस्तीथ करत सरकारच्या ध्येय धोरणाचा त्यांनी आपल्या मनोगतातुन सडाडुन समाचार घेतला.तसेच एकनाथ कदम व शिवाजी महाराज भोसले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान सकाळी आकरा वाजता येथील मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्या संपर्क कार्यालयापासुन निघालेल्या या मोर्चात सरकारच्या धोरणा विरोधात व शेतक-यांच्या खोळंबलेल्या प्रश्नाबाबत घोषनाबाजी करण्यात आली. शहरातुन निघालेल्या या मोर्चात ढोल ताशाच्या गजरात व हातात काँग्रेसचा ध्वज घेत शेतक-यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी जबरदस्त शक्तीप्रदर्षन केले होते. उपविभागीय अधीकारी यांना काँग्रेसच्या वतिने निवेदन सादर करण्यात आले.