आनंदाचा शिधा गरजुवंतांना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या तर्फे मोफत वाटप
परतूर/( प्रतिनिधी ) कैलाश चव्हाण
बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्यातर्फे आनंदाचा शिधा मोफत वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला १०० रुपयात १ किलो साखर, १ किलो चना डाळ, १ किलो रवा ,१ किलो तेल व इतर वस्तू अत्यंत माफक १०० रूपयात वितरण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळाचे मोहन अग्रवाल यांनी कौतुक करून अभिनंदन केले. जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी शिवसेनेच्या वतीने शहरातील अत्यंत गरजूवंत कुटुंबांना १०० रुपये किमतीचा आनंदाचा शिधा किटचे मोफत वितरण शिवसेना कार्यालय गार्डन हॉटेल शेजारी परतुर येथे केले. यात शेकडो गरजू कुटुंबाना मोफत आनंदाचा शिधा राशन कार्ड धारकास वितरण करण्यात आले,याप्रसंगी तालुका प्रमुख अमोल सुरूंग, शहर प्रमुख दीपक हिवाळे, शिवाजी तरवटे ,दत्ता अंभोरे ,सोपान कातारे ,रितेश अग्रवाल, अविनाश कापसे, कृष्णा अग्रवाल, विकास यादव, शिवसेना पदाधिकारी व आदी शिवसैनिकासह शहरातील लाभार्थी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.