शेतकऱ्याच्या शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्याची कैलास सरकटे यांची मागणी
मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
मंठा तालुक्यात ग्रामीण भागातील सर्वच शेतकऱ्यांची शेत रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे शेतकऱ्यांना कायम स्वरूपी रस्ताचे जाळे निर्माण करुन दिल्यास शेत मालाची वाहतूक करता येणार आहे. शेतकऱ्यांचे शेत रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष कैलाश सरकटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री. विधानसभा अध्यक्ष. व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि ग्रामीण भागात अनेक शेत रस्त्याच्या संदर्भात अनेक ठिकाणी वाद .भांडण कोर्ट मध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात ते न्यायालयापर्यंत कितेक दिवस चकरा माराव्या लागतात .यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट येत आहे. प्रत्येक ठिकाणी नंबर बांध आहे. बांधावरुन जाण्यासाठी रस्ता देणे आवश्यक आहे. पुर्वी सर्वे .नंबर हा एकाच मालकिचा असायचा किंवा एकाच कुटुंबातील असायचा पण वाटणी किंवा रजिस्ट्री झाली की वाद निर्माण करण्यात येतात. त्यामुळे रजिस्ट्री व वाटणी पत्रक करतानी त्या दस्तावेज मध्ये नोंद होणे गरजेचे आहे. त्या नंबर बांधावरुन जो रस्ता आवडेल त्या व्यक्तीला शासनाने गुन्हा दाखल केला जावा किंवा तहसीलदार व न्यायालयाचा वेळ घातल्या बद्दल काही दंड आकारण्यात यावा. तहसील कार्यालयात नंबर बांध; सर्वे नंबर; व सरबांध एकच असतो ह्यामध्ये शेतकऱ्यांना समजून घ्यावं. अनेक ठिकाणी महीला समोर करुन संबधीत शेतकऱ्यांवर छेडछाडीचे गुन्हा दाखल केला जातो. समोरचा शेतकरी जर एसी. एसटी असेल तर जातीवाचक गुन्हा दाखल केला जातो. ह्या सर्व बाबतचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक ; नैराश्य ; आपमास्पद वागणुकीतुन आत्महत्या सारखं पाऊल उचलल्या पासून थांबवावे असे निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष कैलाश सरकटे यांनी सांगितले आहे