परतूर येथे नवीन दहा अंगणवाडी देण्याची नरेश कांबळे यांची मागणी

परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण                                                     परतूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिव वाढत चालली आहे पण लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा येथे खूप कमी अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी सेविका यांच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त नोंदणी करण्याची मागणी होत आहे तसेच शहरातील गरोदर मातांचे प्रमाण वाढत असून सुध्दा त्याप्रमाणात या महिलांना लसीकरण, तसेच इतर संदर्भसेवा मिळत नाहीत व नवजात बालक यांना सुद्धा लसीकरण, पोषक आहार तसेच संदर्भ सेवा पोचवणे अडचणीचे होत आहे. 
   यामुळे पोषक आहाराअभावी नवजात शिशू हे कुपोषित होण्याची शक्यता वाढत आहे. यामूळे आपण या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन परतूर शहराला नवीन दहा अंगणवाडीची मान्यता देऊन अंगणवाडी सेविका व मदतनिस भरती प्रक्रीया करून परतूर शहराची अडचण सोडविण्याची विनंती येथील सामाजिक कार्यकर्ता नरेश रामभाऊ कांबळे यांनी निवेदनाद्वारे आपणास केली आहे, नरेश कांबळे हे कित्येक वर्षापासून या मागणीचा पाठपुरावा करत आहेत.
एकात्मिक बाल विकास योजना जालना कार्यालयात श्रीमती गुट्टे यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....