मराठवाड्यात राहुल गांधींजीची पाऊले काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करणारी-जेथलीया ,देगलूर ते नांदेड मा.आ.सुरेशकुमार जेथलियांनी राहुल गांधी सोबत घेतला भारत जोडो यात्रेत सहभाग
प्रतीनिधी समाधान खरात
स्वतंत्र चळवळीपासून आजवर केवळ लोकशाहीचा सन्मान करत सामान्यांच्या भावना जोपासणारी काँग्रेस परिवारातील नेते राहुल गांधी यांची पाऊले मराठवाड्यात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांत जोष, चैतन्य निर्माण झाले असल्याचे गौरवउद्गार मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी काढले.
भारत जोडो यात्रा निमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सोबत देगलूर ते नांदेड सभास्थानापर्यंत जेथलिया यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेभाऊ देशमुख,राजेंद्र राख,कल्याणराव दळे,जालना उपजिल्हाध्यक्ष किसनराव मोरे,प्रदेश प्रतिनिधी अण्णासाहेब खंदारे, माऊली तनपुरे, दिलीप चव्हाण, सादेक जहागीरदार, मंठा तालुकाध्यक्ष निळकंठराव वायाळ, विष्णू चव्हाण,जालना तालुकाध्यक्ष वसंतराव जाधव यांच्या सह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता. या यात्रेत सहभाग नोंदवल्यावर आपल्या प्रतिक्रियेत मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी म्हटले की, देशाच्या जडणघडनीत गांधी परिवाराचे मोठे योगदान असून देशासाठी त्यांच्या परिवातील अनेकांनी प्राणाची आहुती दिली. आमचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत चालताना वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठवाड्यातील काँग्रेसला या यात्रे निमित्त नवचैतन्य मिळाले असून, काँग्रेस कार्यकर्त्यांत वेगळाच उत्साह संचारल्याचे निदर्शनात येत आहे, असे अनेक अनुभव त्यांनी व्यक्त केले. ही यात्रा देशाला नवी दिशा देणारी ठरणार असून, कार्यकर्त्यांनी ही यात्रा मनाशी बांधत पक्ष चळवळ अधिक बळकट करावी असे आहवन त्यांनी यावेळी केले.