प्रलोभनांना बळी न पडता गावच्या विकास करणाऱ्यांना निवडुण दया - अशोक साबळे


परतूर / प्रतिनिधी कैलाश चव्हाण
सध्या निवडणुकिचे गावागावात धुमशान सुरू आहे . यात अनेक उमेदवार जाहीर असून विविध खोटे प्रलोभने दाखवून मतदार बांधवांची दिशाभुल करून फसवणूक करतात . आज रोजी निवडणूक रिंगणात सरंपच पदावर उभे असणारे उमेदवार यांनी गावाच्या विकासासाठी कोणते योगदान दिले हे तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे . यामुळे मतदार बांधवांनी विचारपूर्वक कुणाच्याही भुलथापांना वळी न पडता गावया विकास करणारा उमेदवार निवडावा . 
सन २० १७ - २०१८ ला गावातील शाळांत खोली बांधकाम भ्रष्टाचार उघड करून उर्वरित बांधकाम पुर्ववत सुरु केले. तसेच गावातील अंगणवाडी गावापासून 3किमी अंतरावर भरत असल्याने ति पूर्णवत गावात आणली . व सर्व बालकांना पोषन आहार मिळाला . गावच्या मुख्यरस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी तब्बल ६ दिवस उपोषन केले . विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून गावातील पाणी पुरवठा करणारी कोरडी विदीर आधिग्रहण घोटाळा उघड केल्याने गावाला पाणी मिळाले. 
         आज गावात शुद्ध मुकलब पिण्याचे पाणी नाही . गावात अंगणवाडी व्यवस्थित नाही . गावातील प्राथमिक शाळा गावापासून अंदाजे 3 किमी अंतरावर आहे .
गावातील शाळा 3 किमी अंतरावर आसल्याने गावचे भविष्य उज्ज्वल करणारी पिढी शिक्षणापासून वंचित राहू शकते. 
गावात धोबिघाट नाही . 
मराठा व बोद्ध स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी शासन दरवारी मागणी 
गावात विजेची समस्या जानवते अश्या अनेक सुविधा गावात नसल्याने आपले गाव विकासा पासून कोसो दूर अश्याच उमेदवारांनी ठेवले आहे. जे सध्या खोटे बोलून मोठमोठी विकासाची स्वप्न दाखवतात.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात