अधिसभा पदवीधर मतदारसंघ निवडणुकी चा विद्यापीठ विकास मंच चा सर्व उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार
परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा पदवीधर मतदारसंघ निवडणुकी करिता जालना येथे काल सायंकाळी देवगिरी पतसंस्था या ठिकाणी व्यापक स्वरूपाची बैठक संपन्न झाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट निवडणूक साठी 26 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे
या निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरसकृत विद्यापीठ विकास मंचाने देखील आपले दहा उमेदवार दिले आहे या उमेदवारांची व जालना शहरातील सर्व कार्यकर्ते प्राध्यापक यांची व्यापक स्वरूपाची बैठक जालना येथे घेण्यात आली या बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शक विद्यापीठ विकास मंचचे प्रदेश सचिव डॉ गजानन सानप होते .जालन्यातील एकूण झालेली नोंदणी व त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून या नोंदणीचे रूपांतर मतदानामध्ये करण्याची एक रचना लावण्यात आली *यावेळी खुल्या प्रवर्गातील उमेदवार ॲड.सुनील जाधव यांनी प्रचाराचा प्रारंभ करत सांगितले की निवडणुकीतील विजय पक्का आहेच पण विद्यापीठाचा भ्रष्टाचार मुक्त कारभार, गतिमान प्रशासन, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी काम करत शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करू असे खुल्या प्रवर्गातील उमेदवार ॲड.सुनील जाधव यांनी सांगितले.* यावेळी विद्यापीठ विकास मंच चे महाराष्ट्र सचिव डॉ गजानन सानप उमेदवार ॲड. सुनिल जाधव, गजानन डुकरे , ज्योती तुपे , छाया खाजेकर , सहकार भारतीचे प्रदेश सहसंघटक श्री.विजय देशमुख, प्रा नाना गोडबोले, अभाविप जालना शहर अध्यक्ष वैभव आंबरवाडीकर, भाजपा संघटन सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, प्रा अर्जुने सर ,प्रा ढोभाळ सर ,प्रा खाडे सर , जिल्हा समन्वयक भानुदास दोबाले, सागर मांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.