मनुष्याचे जिवन म्हंटले की त्यामध्ये अनुभव हे येणाारच -हभप चैतन्य महाराज देगलूरकर

तळणी प्रतिनिधी रवी पाटिल 
       आपल्याला प्राप्त झालेली परमार्थीक अनुभूती तूमच्या माझ्या जीवाला दिशा देण्याची अनुभूती महाराजानी या अंभंगातून प्रकट केली मनुष्याचे जिवन म्हंटले की त्यामध्ये अनुभव हे येणाारच जगतामध्ये कोणताही प्राणी असला तरी त्याच्या जिवनामध्ये अनुभव हे येणारच अनूभवाशिवाय जिवन ही संकल्पना आपल्याला विचारात घेता येणार नसल्याचे प्रतिपादन ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यानी पाटोदा येथील सप्ताह मधील चौथ्या दिवशीचे किर्तनपूष्प गुंफत असताना व्यक्त केले 
आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया॥१॥
भाग गेला सीण गेला अवघा झाला आंनदू
प्रेमरसे बैसली मिठी आवडी लाठीमुखासी॥ २॥

तुका म्हणे आम्हां जोगे|
विठ्ठल घोगे खरे मापll३॥

या जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या अभगावर सुंदर निरुपण केले अनुभव फक्त माणसानाच असतात का तर ते नाही पूथ्वीतलावरील सर्व प्राण्यानां अनुभव असतात रस्त्यावरून जाणाऱ्या कुत्र्याला सुध्दा त्याच्या आयुष्यामध्ये अनुभव असतात एखाद्याच्या दारामध्ये गेल्यावर भाकरी मिळायच्या ऐवजी त्याच्या पाठीत लाकूड घातले तर दुसऱ्या दिवशी ते कुञ विचार करत की कालचा अनुभव चांगला नाही असा जीव या जगताच्या पाठीवर नाही की ज्याला अनूभव नाही म्हणून पंरतू अनूभवाने सगळे संपन्न असले तरी सुध्दा मनुष्याच्या जीवनात जोपर्यन्न परमार्थीक अनूभव येत नाही तोपर्यन्त त्याच्या जीवनाची ऊंची नाही जीवनाचे मुल्य नाही मनुष्याला येणाऱ्या अनुभवावरून त्याच्या जीवनाचे मूल्य ठरत असते तसे बघीतले तर मनुष्याला प्रंपचात येणारे अनूभव आणि परमार्थात येणारे अनूभव याचे विपरीत परीणाम आहे प्रपंचाचा अनुभव मनुष्याला येत असला तरी त्या प्रंपचाच्या अनूभवाला फार मूल्य नाही 

*आता मज पाशी नका मज पाशी वदो*

जगदगूरू तुकाराम म्हणतात की प्रांपचीक विषयावर माझ्या जवळ बोलू नका या तत्वाने या विचाराने जगदगुरू तूकाराम महाराजाने जीवन व्यथित केले प्रपंचाचा अनूभव जरी हा अनुभव वाटत असला तरी त्या अनूभवामध्ये तथ्य नाही कारण त्या अनूभवातून माणसांच्या जीवनात काही फल प्राप्ती होत नाही ज्ञानोबारायांना पंधराव्या अध्यायात प्रांपचीक आयुष्याच्या मर्यादा विषद केल्या आहेत प्रपंचाच्या अनुभवाचा इतकी लायकी नाही आणि परमार्थाचा अनूभव आपण घ्यावा इतकी आपली लायकी नाही प्रंपंचामध्ये अनूभवाचा विषय चांगला नाही आणि परमार्थामध्ये अधिकाराचा अनुभवाची अनुऊपलब्धी आणि परमार्थ आणि अनुभवाचा अधिकार्याच्या विषयाचे प्राबल्य म्हणजे प्रंपच

तरी सुध्दा तुकोबाराय त्याना आलेले अनुभव सांगतात मनुष्याच्या जीवनात येणारे अनूभव त्याच्या विचाराची ऊंची ठरवत असते माणसाच्या जीवनाची खोली ठरवत असते अनुभवी माणसाला आजही ग्रामीण भागात आदराचे स्थान आहे तोच व्यवहार अनुभवी माणसाच्या बाबतीत शहरात दिसून येत नाही मनुष्याच्या जीवनात काही तरी हेतू असणे गरजेचे आहे जन्माला आलेल्या प्रत्येकाने ज्ञानेश्वरी गाथा हरीपाठाचे चितंन करणे गरजेचे आहे यासाठी आयुष्यात परमार्थीक साधनेची जोड असणे गरजेचे आहे 

मनुष्याच्या जीवनामध्ये जे वजन येते त्याच्या आयुष्यामधील येणाऱ्या अनूभवातूनच त्याचे महत्व ठरत असते म्हणून परमार्थीक अनूभवातून. समृद्ध झालेले तुकोबाराय जगासमोर येऊन जेव्हा काही बोलतात तेव्हा त्याच्या वचनाला महत्व येते कानामध्ये प्राण आनून ती वचने ऐकावे लागातात आपल्या जीवनाची धन्यता आपल्या जीवनाची परीपूर्णता व्हायची असेल तर ती फक्त त्यानी दिलेल्या वचनानेच होईल दुसरा कुठलाही मार्ग नाही म्हणून तुकोबाराय त्याना आलेला अनुभव जगताला सांगतात अनुभव प्रत्येकाला येत असतात पण ते अनुभव प्रत्येकाला सागांवे असे कोणाचे सामर्थ आहे असे अनुभव कोणाला प्राप्त झाले अनुभव सगळ्यांनाच येतात पण सगळेच अनुभव सागतां येत नसतात काही अनुभव सगळ्यांनाच सांगायचे नसतात काही अनुभव आपल्याला घ्यावे लागतात पण जगाला सागता येत नाही पण काही अनुभव घ्यावे ही लागतात आणि जगाला सांगावे ही लागतात प्रपंचामध्ये येणारे अनुभव माञ जगासमोर सांगता येत नाही हे तीतकेच खरे जसे की विष हे घ्यायचे ही नसते घ्यायला सागांयचे ही नसते याला अपवाद फक्त संत आहेत जे की स्वःत ही अनुभव घेतात आणि जगाला ही देतात 

मनुष्याला आलेला अनुभव हा जगांताला देता आला पाहीजे तुकोबारायांना आलेला अनुभव त्यानी अभंगाव्दारे व्यक्त केला तो अनुभव शांत झालेल्या मनाचा अनुभव आहे तुकोबारiयांचा जो अनुभव सांगीतला तो मनाचा अनुभव सागीतला आता कोठे धावणारे मन शांत झाले त्याचे अनुभव त्यानी याच अभंगातून व्यक्त केले आहेत तुकोबारांयांच्या प्रत्येक शब्दावार किर्तन होऊ शकतो इतके प्रभावी त्याची अभंगरचना आहे जी की तुमच्या आमच्या उध्दारासाठी स्वीकारण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी महारांजांनी केले 
सुरवातीला सपूर्ण गावांत दिवे लावून महाराiजांचे स्वागत केले माता भगीनी नी औक्षण केले ह भ प अशोक महाराज इदगे व पाटोदा ग्रामरथ याच्या नेतुत्वाखाली या सप्ताहाचे आयोजन करन्यात आले 

[ प्रंपच करायला काहीही लागत नाही प्रंपच प्राणीमाञ सुध्दा प्रंपच करू शकतात प्रपंच ही एक प्रक्रीया आहे ती सरळ आहे बसून राहीला तरी प्रपंच होतच असतो ढेकणाचा सुध्दा प्रपंच मनुष्यापेक्षा दहा पटीने मोठा आहे प्रंपच करण्यासाठी बुध्दीमत्ता लागते असे नाही बसून राहीला तरी तो होतो पण तीच गोष्ट परमार्थात होत नाही परमार्थात परीश्रम करावे लागतात साधना करावी लागते तेव्हा वैकूठ प्राप्त होते ]

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....