माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभस्व गोपीनाथराव मुंडे जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला करण्यात आली सुरुवात,रूरबन योजनेच्या माध्यमातून आष्टी शहराला 85 कोटी रुपयांचा निधी दिला ,आष्टी शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी केंद्र व राज्याचे मिळून 12 कोटी रुपयांचा निधी,आष्टी शहराला नगरपंचायत चा दर्जा देणार


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
आष्टी सर्व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी पुरस्कार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
ते आष्टी येथे आष्टी ग्रामपंचायत निवडणूक 2022 च्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की आपण मंत्री असताना आष्टीसह 16 गावांचा राष्ट्रीय रुरबन योजनेमध्ये समावेश करून घेतला व या 16 गावांचा समतोल विकास केला 
आष्टी सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला नगरपंचायत मध्ये रूपांतरित करण्याचा आपला प्रयत्न असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून निश्चितपणे आष्टीला नगरपंचायत चा दर्जा प्राप्त करून देण्याचा आपला प्रयत्न राहील असे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की आष्टी ही माझी कर्मभूमी असून या कर्मभूमीतच खऱ्या अर्थाने मी लहान चा मोठा झालो थेट मंत्री पदापर्यंत पोहोचलो त्यामुळे माझा येथील जनतेवर विश्वास असून निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार व सर्व सदस्य पदांच्या उमेदवारांना अष्टीकर आशीर्वाद देतील असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला
पुढे बोलताना ते म्हणाले की राष्ट्रीय रूरबन योजनेअंतर्गत आष्टी शहराच्या विकासाला 85 कोटी रुपयांचा निधी आपण दिला असून या माध्यमातून आष्टी शहरातील अंतर्गत रस्ते तसेच शहरामध्ये लोंबकाळनाऱ्या विजेचे तार बदलले जवळपास 125 च्या वर जीर्ण झालेले सडलेले पोल बदलण्याचे काम आपण केले असून पर्यटन विकासाच्या माध्यमातून शेख बाबू दर्गा असेल गणपती मंदिरा असेल खंडेश्वर मंदिर असेल या मंदिरांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला हे करत असताना शेख बाबू दर्गा सिद्धेश्वर मंदिर खंडेश्वर मंदिर गणपती मंदिरबाप्पाया मंदिर स्वामी समर्थ मंदिर या सर्व ठिकाणी भव्य अशी सभामंडप बांधून दिले
 त्यामुळे आष्टी शहरांमधील या सर्व धार्मिक स्थळांचा विकास झाला असून येणाऱ्या काळातील आपण आष्टी साठी निधी कमी पडू देणार नाहीत असे अभिवचन यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थिताना दिले पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की आष्टी शहरातील प्रत्येक गल्लीबोळी मध्ये रस्त्यांचे जाळे विनत बारा कोटी रुपयांच्या रस्त्याचे बांधकाम केले त्यामध्ये सीजीएफ फंडातून चार कोटी तर राज्य सरकारच्या निधीमधून आठ कोटी रुपयांची रस्ते बांधण्यात आली असल्याची माहिती यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी बोलताना दिली
शेतकऱ्यांच्या उत्पादित मालावर प्रक्रिया करून जसे आलू पासून चिप्स बनवणे मसाले उद्योग अशा प्रकारचे कुटीर छोटे मोठे उद्योग धंदे आष्टी शहरात सुरू व्हावेत यासाठी आष्टी पासून हाकेच्या अंतरावर मिनी एमआयडीसी आपण प्रस्तावित केली मात्र गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकार बदल झाल्यामुळे हा प्रश्न थोडा रेंगाळला होता मात्र येणाऱ्या काळात हा प्रश्न निश्चितपणाने मार्गी लावण्याची ग्वाही यावेळी त्यांनी उपस्थिताना दिली, आज आष्टी ग्रामपंचायतीचे दिमाखात उभे असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स हे केवळ भारतीय जनता पार्टी मुळेच झाले असल्याचे सांगतानाच या शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या माध्यमातून व्यापाऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध झाल्या असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी नमूद केले
आम्ही प्रत्येक निवडणूक विकासाचे व्हिजन घेऊन लढवत असून आष्टी शहराचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आमची असून आष्टी शहरातील नागरिक निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांना निवडून देतील यात शंका नाही असा विश्वास यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यांनी बोलताना व्यक्त केला
शेगाव पंढरपूर दिंडी मार्गासारख्या महत्त्वकांक्षी मार्गामुळे आष्टी सारखे पंचवीस हजार लोकसंख्येचे शहर हे मुख्य रस्त्यावर आले असून या माध्यमातून आष्टी शहरातील व्यापार उदे वाढला असल्याचे सांगतानाच या महामार्गाच्या माध्यमातून शेतकरी व्यापारी यांचा माल थेट काही तासांमध्ये नागपूर येथे पाठवता येईल तर काही तासातच हा माल सोलापूर कोल्हापूर सारख्या शहराकडे पाठवता येईल असेही यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले
पुढे बोलताना ते म्हणाले की मतदार संघातील जवळपास 200 गावांना वाटर फिल्टर चे पाणी वॉटर ग्रीड च्या माध्यमातून पोहोचले असून येणाऱ्या तीन ते चार महिन्यांमध्ये आष्टी शहरातील सर्वसामान्य नागरिकांना केवळ 12 रुपयात हजार लिटर प्रमाणे उपलब्ध होणारा असून येणाऱ्या काळामध्ये मिनी एमआयडीसी सुरू करणे आष्टी शहराच्या सर्वांगीण विकासात भर घालने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना मिळवून देणे या गोष्टींना आमचे प्राधान्य राहणार असून सर्व स्तरातील जनतेचा सर्व समावेशक विकास करण्यावर आपण भर देणार असल्याचे यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद करतानाच ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी पुरस्कार पॅनलच्या हाती द्या विकास मी आणतो अशा शब्दात आष्टी येथील नागरिकांना विकासाचे अभिवचन दिले
यावेळी प्रचाराचा नारळ वाढवून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली आष्टी शहरातील खंडेश्वर मंदिर- गणपती मंदिर -पाणी वेस- बाप्पाया मंदिर- सिद्धेश्वर मंदिर - बालाजी मंदिर- महावीर चौक मार्गे आझाद चौक बस स्थानक परिसर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शनी मंदिर शिवाजीनगर येथून शेख बाबू दर्गा येथून रमेश थोरात यांच्या घराजवळ रॅलीचे विसर्जन करण्यात आले या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने अष्टी शहरातील नागरिक सहभागी झाले होते 
यावेळी प स रंगनाथ येवले, उपसभापती रामप्रसाद थोरात जि प सदस्य सुदाम प्रधान रामदास सोळंके बाबाराव थोरात मधुकर मोरे अमोल जोशी नारायण पळसे राजेंद्र बाहेती खंडेराव पाटील प्रबोध वीर गणपत आप्पा सातपुते अरुणराव जोशी दिलीप अण्णा थोरात भारत दराडे रमेश बडवने लक्ष्मीबाई दराडे नसरुल्ला काकड अमोल पवार सागर पवार रमेश थोरात हरिभाऊ चौरे अल्ताफ कुरेशी भागवत जगताप कृष्णा टेकाळे विष्णु शहाणे महादेव थोरात साधना गांजाळे श्री गांजाळे खालेक शेख रवी लोंढे बंडू नागरे ज्ञानोबा चौरे रमेश थोरात आसाराम बडवने रफिक पठाण सिद्धेश्वर सोळंके पवन गुळवे कच्ची अजनबी शेख मुन्ना संभाजी मोरे आदित्य पांचाळ अर्जुन थोरात राजेंद्र पांचाळ शेख हबीब मुजीब शेख सईद शेख गणेश वैद्य राहुल केकान विष्णू केकान छत्रपती थोरात बाळू लहाने राजेभाऊ तोर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....