स्वतंत्र नंतर प्रथमच आंबा या गावत पोहचली बस
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
ता.28 भारत स्वतंत्र झाल्या नंतर प्रथमच आंबा या गावतुन परतूर शहराकडे दि 28 रोजी मुलीच्या शिक्षणासाठी मानव विकास अंतर्गत परतूर आगाराच्या वतीने बस सेवा सुरू करण्यात आली. आगार प्रमुख दिगंबर जाधव व सहाय्यक आगार प्रमुख श्री बरसाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
परतूर शहरापासून सात किलोमीटर च्या अंतरावर हे गाव आहे पण हे गाव मुख्य मार्गावर नसल्याने या गावाला बस सेवा नव्हती मागील काही दिवासापासून या ठिकाणाहून बस सेवा सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली या मागणी घेत आगार प्रमुख यांनी ही मागणी मान्य करत याठिकाणी मानविकास अंतर्गत बस सुरू केली. या वेळी मुलीत मोठा उत्साह होता या वेळी मुख्यध्यापक संजय जाधव ,सह शिक्षक रामप्रसाद नवल, रामराव घुगे ,अनिल काळे, सुरेश मसलकर,सुभाष बरकुले,श्रीमती खवणे.चालक आर. आर. कुलकर्णी, वाहक जी. बी. पवार आदी चउपस्थित होते. प्रतिक्रिया कोमल कुरधने-(विद्यार्थी) मागील एक वर्षा पासून आम्ही आंबा येथील शासकीय मुलीच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहोत पण वाहतूक स्वपैशाने करावी लागत होती त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असे पण आता तो टाळला. दिगंबर जाधव-(आगार प्रमुख परतूर) अनेक दिवसांपासून आंबा येथे बस सेवा करण्याची इच्छा होती पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य होत नव्हते. पण आज पासून सुरळीत बस सेवा सुरू झाली. योगेश बरीदे -( सहशिक्षक) आमची अनेक दिवसाची मागणी आगार प्रमुख साहेबाने पूर्ण केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.या मुळे ग्रामीण मुलीच्या शिक्षणाचा मार्ग सोपा झाला.