जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत परतूर ब्राईट स्टार शाळेचे घवघवीत यश
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
तालुक्यातून तीन विद्यार्थ्यांची विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड
जालना येथे दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलात युवराज गणेश लालझरे याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर 17 वर्षाखालील मुलींमध्ये संतोषी गणेश लालझरे प्रथम तर जानवी राजेंद्र मस्के द्वितीय या विद्यार्थिनींनी क्रमांक मिळविले असून या तीनही मुलांची विभागीय क्रीडा संकुल गारखेडा औरंगाबाद येथे होणाऱ्या योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या औरंगाबाद क्रीडा विभाग निवड झाल्या बद्दल त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री गजानन कुकडे सर ,शाळेचे मुख्याध्यापक श्री खनके सर, श्री शब्बीर सर, भालेराव सर व सर्व शिक्षक, पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.