संगणक परिचालकांच्या मोर्चाला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची भेट,संगणक परिचारकांचे मानधन मध्यस्थ कंपनीमार्फत न देता प्रत्यक्ष जिप आथवा ग्रामपंचायत मार्फत द्या या मागणीसाठी पाठपुरावा करणार,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे मोर्चात सहभागी संगणक परिचालकांना आश्वासन,मोर्चात सहभागी संगणक परिचालकांनी दिले माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना निवेदन
प्रतिनिधी कैलाश चव्हाण
नागपूर येथील अधिवेशनादरम्यान राज्यातील संगणक परिचालकांनी टी एस टी व्ही टी या मध्यस्थ कंपनी मार्फत मानधन न देता केंद्र सरकार मार्फत ग्रामपंचायतला दिल्या जाणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतला वर्ग करून प्रत्यक्ष जि प अथवा ग्रामपंचायत इकडून मानधन द्या आयटी महामंडळामध्ये सामावून घ्या आदी मागण्यासाठी राज्यातील संगणक परिचालकांनी काढलेल्या मोर्चाला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी भेट देत संगणक परिचालकाच्या संदर्भामध्ये शासन गंभीर असून लवकरच आपल्या मागण्यांचा विचार करून त्या सोडवल्या जातील यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी मोर्चेकरयांना आश्वासन दिले
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की संगणक परिचालकांना दिले जाणारे मानधन ही केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगांमधून दिले जात असून हे मानधन वितरित करताना मध्यस्थ कंपनीमार्फत वितरित करण्यात येते त्यामुळे प्रत्यक्ष 12000 मानधन असताना व राज्य सरकारचे 1 हजार रुपये मानधन संगणक परिचालकांना असताना कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कंपनीच्या मध्यस्थीने दिले जात असल्यामुळे केवळ 7000 रुपये मानधन संगणक परिचालकांच्या हातावर पडते त्यामुळे या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून हे मानधन थेट ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामपंचायत मार्फत वितरित करण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले
यावेळी संगणक परिचालकांशी संवाद साधताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की राज्यात गतिमान सरकार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या बाबतीत निश्चितच सकारात्मक निर्णय घेतील असे आश्वासन देतानाच या संदर्भात आपण जातीने लक्ष घालून आपला प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी संगणक परिचालकांना सांगितले
यावेळी मोर्चात सहभागी संगणक परिचालकांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे निवेदन देऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवावा अशी मागणी केली
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना देण्यात आलेल्या या निवेदनात माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या आपले सरकार सेवा प्रकल्पात गेल्या 11 वर्षांपासून ग्रामपंचायत पातळीवर संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करीत असून केवळ सात हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या मानधनावर ते काम करीत असल्याचे म्हटले असून राज्यातील सहा कोटी ग्रामीण भागातील जनतेला नियमितपणे सेवा पुरवण्याचे काम संगणक परिचालकाच्या माध्यमातून होत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कोरोना काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून संगणक परिचालकांनी काम केले असून त्यामध्ये 19 जणांना आपला प्राण गमवावा लागला असेही निवेदनात नमूद करण्यात आले असून
मार्च 2021 मध्ये तात्कालीन ग्रामविकास मंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिलेB होते त्यामुळे आम्हाला शासकीय सेवेमध्ये सामावून घेत शासनाचे वेतन व भत्त्याचा लाभ द्यावा अशी ही मागणी या निवेदनात करण्यात आली आली असून या निवेदनावर महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे सचिव मयूर कांबळे उपाध्यक्ष मुकेश नामेवार विजयानंद वेढेकर अशोक चव्हाण, भरत कवळे विष्णू ढोबळे, वैजनाथ काटे नारायण सोळंके यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत