शेवगा येथील सरपंच व सदस्यांचा सर्वपक्षीय गावकर्यांच्या वतीने सत्कार संपन्न
परतूर प्रतिनिधी
तालुक्यातील शेवगा ग्रामपंचायतीची निवड प्रक्रिया हि बिनविरोध झाली निवड झालेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा शेवगा येथील सर्वपक्षीय गावकर्यांच्या वतीने दिनांक 20 डिसेंबर मंगळवार रोजी श्री हनुमान मंदिर येथे भव्य नागरी सत्कार संपन्न झाला.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना सांगितले की मी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असुन येणार्या काळात आपण सर्व गावकरी व सर्व पक्षीय मिळुन गावाचा विकास साधुयात.बिनविरोध निवडीबद्दल व सहकार्या बद्दल सरपंच व सदस्यांनी गावकर्यांचे व सर्वपक्षीयांचे यावेळी आभार व्यक्त केले.