शासनाकडून शेतकऱ्याला पन्नास हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान खात्यात जमा , परतूर : एसबीआय बँकेचा शेतकरी ठरला पहिला मानकरी
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतुर तालुक्यातील शेवगा येथील शेतकरी भास्कर मारोती धुमाळ या शेतकऱ्याने नियमित पीक कर्ज भरल्याने एसबीआय बँकेकडून या शेतकऱ्यास शासनाच्या योजनेचा पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
परतुर शेवगा येथील शेतकरी भास्कर धुमाळ यांनी नियमित कर्ज भरल्याने पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मिळाल्याने सत्कार करतांना एसबीआयचे उपप्रबंधक मनोहर गावडे, कृषी अधिकारी प्रवीण दुधाट, कर्मचारी सह शेतकरी. दिसत आहेत.
शासनाने शेतकर्यांना थकीत कर्जदार यांना महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर करून लाभ देण्यात आला. तर नियमित कर्ज फेडणार्या शेतकर्यांना शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यात परतूर भारतीय स्टेट बँकेचे नियमित कर्ज भरणारे शेतकरी भास्कर धुमाळ यांचा स्टेट बँकेचे उपप्रबंधक मनोहर गावडे यांच्या हस्ते पन्नास हजार रुपये अनुदान खात्यात जमा करून शेतकर्यांचा गावात जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्टेट बँकेचे कृषी अधिकारी प्रवीण दुधाट, कृषी सहाय्यक गणेश जाधव, महादेव थोरात, विलास धुमाळ, सह शेतकरी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपप्रबंधक मनोहर गावडे, कृषी अधिकारी प्रवीण दुधाट, यांनी शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड करून होणारे फायदे व थकीत असलेल्या शेतकर्यांचे होणारे नुकसान यांची माहिती दिली. आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.