स्व दत्तराव नाना लोणीकर व स्व अन्नपूर्णा (बाई) लोणीकर यांचा वर्षश्राद्ध कार्यक्रम लोणी ता परतूर येथे संपन्न====================माता पित्याच्या सेवेतच खऱ्या अर्थाने ईश्वरप्राप्ती*_ ह भ प प्रकाश महाराज साठे==================आई-वडिलांच्या पुण्याई मुळेच मी इथ पर्यत पोहचलो*आमदार बबनराव लोणीकर
प्रतिनिधी कैलाश चव्हाण
आई-वडिलांच्या चरणातच खऱ्या अर्थाने ईश्वरासून ईश्वराला भेटण्यासाठी आई-वडिलांची सेवा करा आई वडील हे जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ असून आई-वडिलांची सेवा करण्यात च खऱ्या अर्थाने सर्व जग सामावलेले असल्याचे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प प्रकाश महाराज साठे यांनी सांगितले
ते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे वडील स्व दतराव नाना लोणीकर व स्व अन्नपूर्णाबाई दत्तराव लोणीकर यांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रम प्रसंगी बोलत होते
याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिवस गोड व्हावा
या अभंगाचे निरूपण करताना ह भ प प्रकाश महाराज साठे पुढे म्हणाले की स्व दत्तराव नाना लोणीकर व स्व अन्नपूर्णाबाई दत्तराव लोणीकर यांची आमदार बबनराव लोणीकर यांनी खऱ्या अर्थाने सेवा केल्यामुळेच त्यांना उत्तुंग झेप घेता आली माता पित्याच्या संस्कारात वाढलेल्या आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघासह राज्याचे नेतृत्व केले हे करीत असताना आई-वडिलांनी दिलेले संस्कार ते विसरले नाहीत सर्व सामान्य जनतेची सेवा करताना दिन दलित दुबळा पीडित यांच्या सेवेत गेली 40 वर्षे घातली अशीच आई-वडिलांची सेवा प्रत्येकाने करावी असे सांगतानाच ह भ प प्रकाश महाराज साठे म्हणाले की आई-वडिलांच्या चरणातच खऱ्या अर्थाने जग सामावलेले असून प्रत्येकाने आई-वडिलांची सेवा केल्यास निश्चितपणाने भारताची संस्कृती अधिक दृढ होऊन कुटुंब संस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल असे यावेळी बोलताना ते म्हणाले पुढे बोलताना ह भ प साठे महाराज म्हणाले की जगाचे कल्याण हे खऱ्या अर्थाने आई-वडिलांच्या सेवेत असून माणसाने धर्म आचरण करीत नित्यनियमाने आई-वडिलांची सेवा करावी जेणेकरून आपला अंत समय गोड होईल चांगला होईल अशा प्रकारचे निरूपण केले
यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी माझ्या आई वडिलांच्या संस्कारामुळेच मी इथपर्यंत मजल मारू शकलो असे सांगतानाच मुळातच माझे कुटुंब हे माझ्या आई-वडिलांपासूनच वारकरी संप्रदायाशी निगडित असून वडिलांनी सतत तीस वर्ष पंढरीच्या पांडुरंगाची वारी केली त्यांची पंढरीच्या पांडुरंगावर नितांत श्रद्धा होती हेच संस्कार आमच्या भावंडावर आणि मुलावर झाल्यामुळे समाजसेवेसाठी आम्ही नियमितपणे स्वतःला वाहून घेत आलो असल्याचे यावेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की आपण मंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या मंत्रीपदाचा उपयोग राज्यातील जनतेसाठी केला यामध्ये 18000 गावातील लोकांची तहान भागावी यासाठी पाणीपुरवठा योजना दिल्या परतुर मंठा विधानसभा मतदारसंघासाठी वॉटर ग्रील सारखी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आखून या योजनेच्या माध्यमातून मतदार संघातील 300 गावातील लोकांची तहान भागवावी यासाठी प्रयत्न केले आज मी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून आज घडीला जवळपास दोनशे गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी जनसामान्यांना भेटत असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
अंबड जवळ पंढरपूर कडून येणाऱ्या वारकऱ्यांचा ट्रक खाली ।चिरडून दुर्देवी मृत्यू झाला होता ही गोष्ट अतिशय वेदनादायी होती मात्र मी मंत्री होताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत शेगाव च्या संत गजानन महाराजांपासून तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायापर्यंत दिंडी मार्ग साकारण्यासाठी प्रयत्न केले त्याला यश मिळवून आता हा मार्ग सर्वांसाठी खुला झाला आहे या मार्गामुळे परतूर विधानसभा मतदारसंघातील अनेक गावे रहदारीच्या दृष्टीने जोडली गेली असून या माध्यमातून वारकरी यासह शेतकरी सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले
ह भ प साठे महाराजांनी आपल्या
सुश्राव्य वाणीतून आईची महती गायली यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे डोळे भरून आले
यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर ह भ प चपटे महाराज नाना महाराज पुरुषोत्तम पुरीकर ह भ प रमेश महाराज वाघ अंकुश आबा बोराडे संदीप गोरे गणेशराव खवने बाळासाहेब जाधव रामराव लावणी कर अंकुशराव बोबडे प्रल्हाद बोराडे पंजाब बोराडे कैलास बोराडे रमेश भापकर सतीश निर्वळ प्रसाद बोराडे ज्ञानेश्वर शेजुळ नागेश घारे लक्ष्मणराव टेकाळे गजानन उपाड प्रसाद गडदे सुभाष राठोड अर्जुन राठोड शिवाजी पाईकराव रंगनाथ येवले रामप्रसाद थोरात किशोरराव पवार गजानन देशमुख संदीप बाहेकर प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे प्रवीण सातोणकर आतिश राठोड परसराम यादव रंजीत मोरे सिद्धेश्वर सोळंके प्रदीप ढवळे बबलू सातपुते बाबाराव थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती