परतुर आरोग्य कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी संजय राऊत तर सचिव पदी अंकुश चव्हाण
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
येथील पंचायत समिती सभागृह येथे दिनांक 28 रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न झाली
या बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल सिंग ठाकूर, आर आर तोटे आरोग्य पतसंस्था संचालक , साथरोग अधिकारी डॉक्टर नागदरवाड यांची प्रमुख उपस्थिती होती
या बैठकीत आरोग्य कर्मचारी संघटनेची निवड करण्यात आली यामध्ये सर्वानुमते संजय राऊत यांची तालुकाध्यक्षपदी तर सचिव म्हणून अंकुश चव्हाण यांची निवड करण्यात आली कोषाध्यक्ष अशोक आडे तालुका महिला कृती समिती अध्यक्ष श्रीमती सोनाबाई काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
या निवडीबद्दल सर्व आरोग्य कर्मचारी यांनी नवीन कार्यकारणी शुभेच्छा दिल्या