दैठणा खु ग्रामपंचायत राकॉ च्या ताब्यात,सरपंचासह सर्व उमेदवार विजयी
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत दैठना खुर्द ग्रामपंचायत निवडणूकीकडे तालुक्यातील अनेक दिग्गजाचे लक्ष लागले होते. या अटीतटिच्या निवडणुकीत भाजपाच्या सर्वच उमेदवारांचा सफाया करीत राष्ट्रवादीच्या पॅनलचे सर्वच उमेदवार विजयी झाले आहे. दैठना खुर्द येथे भाजपचे प्रतिष्ठेचे पदाधिकारी असल्याने या ग्रामपंचायतीकडे तालुक्यातील अनेकांचे लक्ष लागले होते.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र दैठना खुर्द येथे राष्ट्रवादीची मोठी ताकद असल्याने भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादीने एका हाती सत्ता मिळविण्यात यश आले. ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत दैठना खुर्द येथे राष्ट्रवादीने एका हाती सत्ता मिळाल्याने युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी विजयी सरपंच सदस्याचा सत्कार करून शुभेछा दिल्या.
दैठना खुर्द येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पॅनलच्या सर्व सदस्य व नेतृत्वावर विश्वास ठेऊन प्रचंड मतांनी निवडून दिले. गावच्या व ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी नेहमी पुढाकाराची भूमिका घेऊन जनतेचे प्रश्नाची सोडवणूक करील. विश्वास सार्थ ठरेल.
सुनील सुदाम तायडे, नवनिर्वाचित सरपंच, दैठना खुर्द