प्रा.सिध्दार्थ पानवाले यांना समाजभुषण पुरस्कार जाहीर.
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
07 डिसेंबर. नाशिक येथील नामांकीत तेजस फाऊंडेशन ने राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली.संस्थेच्या अध्यक्ष चित्रपट तथा नाट्य दिग्दर्शिका मेघा डोळस यांनी प्रसिध्दीपत्रक आणि निवडीच्या पत्राद्वारे जाहीर केले.
सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्या व्यक्तींना हा पुरस्कार संस्था गेल्या 18 वर्षांपासुन जाहीर करत आलेली आहे. तेजस फाउंडेशन संस्थेने आजपर्यंत पुरस्कार दिलेल्या व्यक्तींपैकी सर्वांत तरुण वयाचे व्यक्ती आहेत.
येत्या १३ डिसेंबर रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र,औरंगाबाद येथे हा पुरस्कार विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्वांच्या उपस्थितीत वितरीत केला जाणार आहे.
सदर पुरस्कार जाहीर झाल्यापासुन निवृत्त IAS ई झेड खोब्रागडे,निवृत्त IAS उत्तमरव खोब्रागडे,निवृत्त IAS सुभाष हजारे म.स.शि.प्रसारक मंडळचे सचिव कपीलआकात,माजी सभापती बाळासाहेब अंभीरे,ला.ब.शा.महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.खंदारे,उपप्राचार्य रवी प्रधान,माजी नगरसेवक विजय राखे,सादेक खतीब,सिध्दार्थ बंड,डॉ.आबुज,डॉ.केशव बरकुले,ॲड.मस्के,ॲड.मुजाहीदकाजी,जालना नगरसेवक निखील पगारे,बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर,सिध्दार्थ इंगळे तसेच परतुर मंठा परिसरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.