मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष प्रत्येक तहसील ला सुरू करा:-सचिन खरात
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करा, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका नियोजनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील गरीब-गरजु रुग्णांना आर्थिक आधार मिळावा म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी गरजू नागरिकांना मुंबईत मंत्रालयात खेटे मारावे लागतात. परिणामी यामध्ये गरजू नागरिकांचा वेळ जातो शिवाय त्यांना आर्थिक भुरदंड व प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे गरजू व्यक्तींना वेळेत मदतही मिळत नाही. अनेक नागरिक पैशाच्या अभावी मुंबई येथे मंत्रालयात येऊ शकत नसल्याने निधीसाठी प्रस्ताव देखील सादर करू शकत नाही. यामुळे आशा नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी पासून वंचित राहावे लागते. तालुक्यातच तहसील कार्यालयात निधीसाठी प्रस्ताव सादर करता यावा म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष उभारण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात मनेश वटाने,अमृत राठी आदींनी केली आहे.