रेल्वे स्टेशन परतुर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
विश्वरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता परतुर रेल्वे स्टेशन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आर.सी.सी.मित्र मंडळ व पंचशील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन केले होते,
यावेळी रेल्वे पोलीस दलाचे राजेश उबाळे, मेघराज पाटील व आर सी.सी.मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रदीप (दादा) साळवे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल नाटकर,व पत्रकारअशोक ठोके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून अभिवादन सभेची सुरुवात केली यावेळी सर्वांनी सामुदायिक वंदना घेतली यावेळी बोलताना विकास वेडेकर म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्राचे पालन केले पाहिजे तसेच समता,स्वातंत्र्य आणि बंधुभाव हा देखील आपण जपला पाहिजे आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे आपण त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे आपण पुस्तके वाचली पाहिजेत वाचाल तर वाचाल असे त्यांनी यावेळी अभिवादन सभेस संबोधित करताना सांगितले आपण आपले विचार मांडले पाहिजेत नंतर त्यांना ते घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला रमेश कदम, संतोष कदम,दिलीप साळवे, दीपक हिवाळे, अरुण पाडेवार, अंतरा ठोके आरोही पाडेवार, खुशी इंगळे,बाळासाहेब कदम,नीतिन खरात,रवी इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल नाटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.