युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यात तीन तास राज्यातील विविध विषयावर चर्चा ,प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केलेल्या कामाचा कार्य अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी जी सुर्या यांच्याकडे सुपूर्द केला



प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
दिल्ली येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या व भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्यासह प्रदेश महामंत्री अनुप मोरे सुशील मेंगडे, शिवानीताई दाणी यांच्यात झालेल्या बैठकीत युवा मोर्चाच्या पुढील रणनीती विषयी सुमारे तीन तास चर्चा झाली
या चर्चेदरम्यान युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर व महाराष्ट्र युवा मोर्चा यांनी केलेल्या धन्यवाद मोदीजी उपक्रमातील पाच लाख पत्र संकलित केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी विशेष कौतुक केले
पुढे या चर्चेदरम्यान नव मतदार नोंदणी युवा वॉरियर्स शाखांचा विस्तार अदि बाबतीमध्ये विस्ताराने चर्चा करण्यात येऊन, येणाऱ्या काळामध्ये राज्यात युवावारीयर्स शाखा चा राज्यभरात मंडळ स्तरापर्यंत विस्तार करण्यासंदर्भात राहुल लोणीकर यांनी आपले मत व्यक्त करताना राज्याच्या कार्याकोपऱ्यामध्ये 18 ते 24 वयोगटातील युवा कार्यकर्त्यांना युवा वारीयर्स च्या माध्यमातून भाजपशी सलगरीत करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगतानाच नव मतदार नोंदणी अभियानाच्या माध्यमातून राज्यातील विविध महाविद्यालया मध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून नव मतदारांची नोंदणी केली जाणार असल्याची यावेळी राहुल लोणीकर यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना सांगितले
महाराष्ट्र राज्य मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा जिल्हा ,मंडळ स्तरावरील युवा वॉरिअर शाखांचा विस्तार थेट ग्रामपंचायत स्तरापर्यंत करणार असून, युवक युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी जोरकसपणे मोहीम राबविण्यात येणार असून या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी विद्यार्थिनींना नव मतदार नोंदणी अभियानाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी व भाजपाचे विचार तळागाळातील सर्वसामान्य युवक युवतींपर्यंत पोहोचण्याचे काम युवा मोर्चाच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती यावेळी बैठकीदरम्यान युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी दिली
दरम्यान धन्यवाद मोदीजी अभियानामध्ये राज्यातील थेट शेवटच्या माणसापर्यंत युवा मोर्चा पोहोचला असून नरेंद्र मोदीजींनी जनसामान्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती देण्याचे काम युवा मोर्चा ने केले असल्याचे या वेळी राहुल लोणीकर यांनी सांगितले
यावेळी प्रदेश प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत केलेल्या प्रवासाचा व कामाचा कार्य अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी जी सूर्या यांच्याकडे सुपूर्द केला 
राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी ची सूर्या यांच्यासोबत जवळपास तीन ते चार तास झालेल्या प्रदीर्घ साधक बाधक चर्चेमध्ये महाराष्ट्र राज्यातील युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष व युवा मोर्चाच्या कामाबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....