महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील आष्टी व अकोली येथील पांदण रस्त्यांच्या कामाची माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी केली पाहणी,पांदण रस्ते पाहून केले समाधान व्यक्त
प्रतिनिधी कैलाश चव्हाण
बागायतदार व कोरडवाहू शेतकऱ्यांना, खऱ्या अर्थाने शेतीत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मशागतीसाठी जाणे येणे करणे अतिशय पानंद रस्त्या मध्ये असलेल्या गुडघाभर चिखलामुळे खूप मोठा त्रास सहन करावा लागतो मात्र आष्टी व अकोली येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून झालेल्या पाणंद रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे मत यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले
थेट शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी उत्कृष्ट असे म्हणून रस्त्यावरील काम झाल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पिकणारी अन्नधान्य सोबतच डाळिंब ,मोसंबी ऊस, केळी ,सिताफळ आदी उत्पादित मालांना शेतकऱ्यांना सहज बाजारपेठेत घेऊन जाणे शक्य होणार आहे
उस मुख्य पिक आष्टी व परिसरातील शेतकऱ्यांचे असून केवळ, रस्त्याच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना ऊस लागवड करता येत नव्हती अनेक फळपिके घेता येत नव्हती अशा परिस्थितीत हे पांदण रस्ते झाल्यामुळे शेतकऱ्यांना या पांदण रस्त्याच्या माध्यमातून आपल्या शेतातील फळबाग उसाचे क्षेत्र वाढवता येणार असल्याचे यावेळी आमदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले
या पांदण रस्त्यामुळे यांत्रिकीकरणाद्वारे शेती करणे ही अतिशय सुलभ झाले असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार असून झालेल्या पांदन रस्त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे यावेळी रामप्रसाद थोरात तुकाराम जी सोळंके बाबाराव जी थोरात सरपंच मधुकरराव मोरे अमोल जोशी बबलू सातपुते श्रीधर गांजाळे अनंतराव आगलावे डॉ नारायणराव सरकटे बापूराव सोळंके अंकुशराव चव्हाण दामोदर सोळंके आसिफ कच्ची राजेभाऊ तौर, अर्जुन थोरात मुजीब भाई माऊली सोळंके पंजाब देशमुख भुजंग गाते रवी देशमुख रामराव सोळंके संजय सोळंके अशोक शेळके बाबासाहेब शिंदे प्रकाश नंदुरकर हनुमान इंगळे परसराम नरसाळेउमेश सोळंके, रमेश थोरात, मारोती थोरात,अल्लताब कुरेशी विठ्ठल सोळंके नागेश जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती