चिंचोली ग्रामपंचायत सरपंचासह सदस्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश,उस्मानपूर येथीलही कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश , माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
प्रतिनिधी कैलाश चव्हाण
चिंचोली ता परतूर येथील ग्रामपंचायत सरपंच यांच्यासह सदस्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला
यावेळी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी भारतीय जनता पार्टीचा रुमाल व पुष्पहार घालून सत्कार केला
यावेळी प्रकाश परमेश्वर चव्हाण सरपंच बाजीराव भुजंगराव कातारे उपसरपंच अनंत वशिष्ठ टेकाळे सदस्य गोविंद मदनराव चव्हाण सदस्य दिगंबर सुदामराव चव्हाण सदस्य दिगंबर प्रभाकरराव कातारे सदस्य हरिभाऊ सोळंके सदस्य बाळासाहेब ज्ञानोबा गोरे सदस्य किसन शिवाजी घुगे सदस्य कृष्ण हरिभाऊ चव्हाण सदस्य दामोदर सोळंके कृष्णा कातारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर उस्मानपुर ता परतुर येथील मदन ओमप्रकाश राऊत संजय अंबादास आंबेकर दत्ता नारायण वैद्य किसन भिमराव आंबेकर नवीन शेख चांद सारंगधर राऊत सिद्धेश्वर राऊत हरिभाऊ लक्ष्मण राऊत अमोल किसन आंबेकर नामदेव रमेश वंजारे आदींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
यावेळी बोलताना युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर म्हणाले की माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून, मतदार संघाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून प्रत्येक ग्रामपंचायतला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून मोठे विकास कामे झाले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले पुढे बोलताना ते म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामपंचायत च्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून कार्यकर्त्यांचा वाढता ओघ हे खऱ्या अर्थाने विकास कामांची पावती असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती