जगात सर्वात श्रेष्ठ वारकरी संप्रदाय आहे तो जपला पाहिजे..- विलास महाराज गेजगे..
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
=परतूर तालुक्यातील येनोरा येथे दिनांक 16 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह ची सोमवारी काल्याच्या कीर्तनाचे सांगता झाली. महान संत शिरोमणी यांच्या चार चरणाचा अभंग घेऊन महाराजांनी कीर्तन केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आजची वारकरी संप्रदायची परंपरा ज्येष्ठ आहे वारकऱ्यांनी संताचे विचार जो पासत पुढच्या पिढीला संग्रहित ते विचार ठेवायचा आहे. संताचे विचार घराघरा पर्यंत पोहचवणे हे सर्व वारकरी धारकरी यांची जबाबदारी आहे. माणसाने आजच्या काळात माणसाने सैरावैरा धावू नये .
या विषयी चिंतन करणे गरजेचे आहे. या कीर्तनाला भाविक भक्तां चा मोठा प्रतिसाद मिळाला या कीर्तन सोहळ्याला सर्व भाविक भक्त वारकरी संप्रदाय, गायक वादक, मृदुंग वादक, काकडा नेतृत्व, पारायण नेतृत्व, गाथा भजन, हरिपाठ नेतृत्व, व सर्व भजनी मंडळ व गावकरी मंडळी उपस्थित होती.