दैठना खुर्द येथील ग्रामसेवक गावात फिरकेना

परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
तालुक्यातील दैठना खुर्द येथील ग्रामसेवक आर.बी मेहत्रे हे गावात गेल्या तीन आठवड्या पासून आले नसल्या गावकर्‍याची कामे खोळंबल्याने ग्रामस्थामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शासनाने ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी गावचा सचिव म्हणून ग्रामसेवक यांची नियुक्ती केली आहे. मात्र ग्रामसेवक गावाच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गावातच नसल्याने शासनाच्या उद्देशाला हरताळ फासण्याची काम ग्रामसेवक यांच्याकडून होत असतांना वरिष्ठ मात्र बघ्याची भूमिका घेऊन ग्रामसेवक यांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याने गावाच्या समस्येकडे तसेच नागरिकांच्या खोळंबलेल्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने हम करेसो कायद्या प्रमाणे वागत असल्याने याला लगाम घालण्याची मागणी होत आहे.
शासनाकडून गाव विकास करण्यासाठी थेट ग्रामपंचायतच्या खात्यात निधी वर्ग करून गावचा विकास साधण्याचा प्रयत्न होत असतांना शासन आणि लोकप्रतिनिधी यांचा दुवा म्हणून काम करणारे ग्रामसेवक हे विकास कामात आणि नागरिकांच्या कामात गावात न येता खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याने अश्या ग्रामसेवकावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करून जरब बसविण्याची मागणी ग्रामस्थाकडून होत आहे. दैठना खुर्द येथील एका ग्रामसेवकाकडे हातडी, क-र्हाळा, तीन गावाचा पदभार असल्याने तिन्ही गावात ग्रामसेवक नियमित येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून ग्रामसेवक हे मुख्यालयी न राहता जालना येथून अपडाउन करीत आहे. मागील काळात केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.

या बाबत ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. तसेच विस्तार अधिकारी वाय.यू परदेशी यांना विचारले असता ग्रामसेवक हे पंचायत समिति कार्यालयात मंगळवारी उपस्थित होते. मात्र गावात येत नसेल तर त्या बाबत कळविण्यात येईल असे सांगण्यात आले.


   

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात