लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात जागतिक हिंदी दिवस साजरा
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
लाल बहादुर शास्त्री महाविद्यालय हिंदी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. भारत खंदारे होते
या प्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते प्रा. बद्रीनारायण बिडवे यांनी हिंदी भाषेचा वापर आणि गरज याविषयी सांगितले. त्यांनी सांगितले की, भारतातील सर्व जाती-धर्मांना एकत्र ठेवण्याचे महत्त्वाचे काम हिंदी भाषा करते. त्याच वेळी, जगभरात पसरलेल्या भारतीय लोकांमध्ये आपली मूल्ये आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम करत आहे. हिंदी ही लवकरच राष्ट्रभाषेतून जागतिक भाषा होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समारंभाचे प्रस्ताविक हिंदी विभागाचे प्रमुख डॉ.विजयानंद गंगावणे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी जागतिक हिंदी दिन कधी आणि का साजरा केला जातो या विषयावर आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की भारतात 10 जानेवारी 1975 रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती. परदेशात गेलेल्या भारतीयांना त्यांच्या देशाशी जोडण्याचा मूळ उद्देश होता. ही परिषद दरवर्षी 10 जानेवारी रोजी जगातील विविध देशांमध्ये भारतीय दूतावासाद्वारे साजरी केली जाते. 2006 मध्ये, तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील जागतिक हिंदी परिषदेच्या शुभ मुहूर्तावर 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी हा जागतिक हिंदी दिन साजरा केला जाऊ लागला.अध्यक्ष प्राचार्य डॉ.भरत खंदारे यांच्या भाषणाने समारंभाची सांगता झाली.आभार डॉ.वजीर यांनी तर संचालन डॉ.माने यांनी केले.समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.भारत सुरुंग,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रवी प्रधान, डॉ.टकले, डॉ.कोटलवार, डॉ.पाठक, डॉ.कुलकर्णी, डॉ.मनवर, डॉ.मुजमुले, डॉ.दुबाले, डॉ.बोथीकर, डॉ.गायके आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.