अबॅकस स्पर्धेमध्ये विषेश प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रतिनिधी सातोना/ पांडुरंग शिंदे
   श्री गजानन जी चॅम्प अबॅकस क्लासेस (सातोना खु) येथे.
 नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन अबॅकस स्पर्धेमध्ये विषेश प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य.
 सत्कार करण्यात आला. 
    गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  क.नी. टोणपे सर, संपत आप्पा आकात तर अध्यक्ष म्हणून संचालिका दुर्गा आकात मॅडम, संतोष सर, गायकवाड सर विद्यार्थी व पालक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
राज्यस्तरीय ऑनलाईन अबॅकस स्पर्धेमध्ये प्रामुख्याने 1) दुष्यंत दीपक डहाळे (जी चॅम्प सुपरस्टार फर्स्ट लेवल)2) आराध्या अर्जुन आकात (जी चॅम्प सुपरस्टार जूनियर लेवल)
3) शेख हाशिम शेख मुस्तकुद्दीन (स्टेट लेवल फर्स्ट रँक)4) अपूर्वा अर्जुन आकात ( स्टेट लेवल फर्स्ट रँक) या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले.
व इतर 14 विद्यार्थ्यांना सहभागीता प्रमाणपत्र व मेडल प्राप्त झाले.
उपस्थित सर्व मान्यवरांनी ट्रॉफी मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष घरडे यांनी केले व आभार प्रदर्शन संचालिका दुर्गा मॅडम यांनी केले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....