शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सभागृहात आक्रमक भूमिका घेणारे आ.विक्रम काळे यांना निवडून द्या आमदार सतीश चव्हाण यांचे आवाहन
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
आमदार विक्रम काळे शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने सभागृहात मांडत असत. सरकार आपले असो की विरोधी पक्षाचे असो शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सभागृहात ते नेहमीच आक्रमक भूमिका घ्यायचे. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणार्या आ.विक्रम काळे यांना पुन्हा विधी मंडळात मराठवाड्यातील शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केले.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 30 जानेवारी 2023 रोजी होत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ आज (दि.१६) मंठा व परतूर येथे आ.सतीश चव्हाण यांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात आयोजित सभेत बोलताना आ.सतीश चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही शासनस्तरावर जोमाने पाठपूरावा सुरू केला. मात्र कोरोनासारख्या नव्या संकटाला सरकारला सामोरे जावे लागले. मात्र अशाही परिस्थितीत 23 जून 2022 रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासकडे आम्ही शाळा अनुदान, जुनी पेन्शन, शिक्षक-प्राध्यापक भरती यासारख्या महत्वाच्या प्रश्नांसाठी बैठक घेतली. त्यामध्ये शाळा अनुदान व जुन्या पेन्शनचा प्रस्ताव सम्यक समितीच्या अहवालासह मंत्रीमंडळासमोर आणा, सरकार निर्णय घेईल असे निर्देश अजितदादा पवार यांनी दिले होते. परंतु काही दिवसांमध्ये आपणास अनपेक्षीत सत्ता बदलाला सामोरे जावे लागले. खरे तर अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेले केंद्रातील सरकार हे फक्त उद्योगपतींचे आहे. आज महागाई, बेरोजगारी त्याच बरोबर शेतकर्यांचा मालाला भाव नसणे या सारख्या महत्वाच्या समस्यांपुढे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. मात्र सरकारला याचे काही देणे-घेणे नसल्याचे सांगत आघाडीचे सरकार असताना महागाईवर बोलणारे आता मुग गिळून गप्प असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. शिक्षकांचे देखील अनेक प्रश्न आज शासन दरबारी प्रलंबित आहेत याची आम्हाला जाणीव आहे. हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आ.विक्रम काळे यांना प्रथम पसंतीचे मत देवून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन यावेळी आ.सतीश चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव कपील आकात, डॉ.शिवाजी मदन, प्राचार्य डॉ.भारत खंदारे, अंकुशबापू तेलगड, विजय राखे, बाबा घाडगे, अखील काजी, कदीर कुरेशी, सत्तार कुरेशी, संजू राऊत, अनवर पठाण, परवेज देशमुख, राजू तेलगड तर मंठा येथील स्वामी विवेकानंद महाविद्याालयात आयोजित सभेप्रसंगी आमदार राजेश राठोड, भाऊसाहेब गोरे, प्राचार्य डॉ.माणिकराव थिटे आदींची उपस्थिती होती.
---------------------------------------