आम्हावरी धरीलीया राग काय तुझे सांग केले आम्ही -भ प विष्णू महाराज देशमूख

तळणी प्रतिनिधी रवी पाटिल 
    अध्यात्मामध्ये शंकराने जाळले म्हणजे ज्ञानाने जाळले ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे आणि भगवान श्रीकृष्णाने जाळले म्हणजे विरहाने जाळले काम कधी कधी ज्ञानाने ही नष्ट होत नाही तो भक्तीन पळून जातो असे प्रतिपादन ह भ प विष्णू महाराज देशमूख यानी तळणी येथे काल्याची प्रसंगी केले तळणी येथे चालू असलेल्या अंखड हरिनाम सप्ताहची सांगता काल काल्याने झाली संत नामदेव महाराज यांच्या आम्हावरी धरीलीया राग काय तुझे सांग केले आम्ही या अभंगावर निरूपण केले 
भगवान शंकराची समाधी भंग करण्यासाठी रती कामदेव गेले कामदेवाने जेव्हा आपल्या पंच बाणाने समाधी भंग केली महादेवानी तीसरा डोळा उघडून कामदेवाला जाळले एकदा जळाल्यानंतर ही कामदेव सावधान होत नाही मग रास क्रीडेतून श्रीकृष्णाच्या ह्दयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो पण ते कामदेवाला शक्य झाले नाही कारण कृष्ण हा निष्काम निराळा आहे मग कामदेवाने गोपीकेच्या ह्दयात प्रवेश केला कृष्णा ने जेव्हा ही घटना जाणली . कृष्ण जाण्याचे हे खरे कारण आहे कृष्ण अंतरधाम होण्याचे हे कारण काम आला होता आणि काम हा अग्नी आहे आणि या अग्नीला जाळण्यासाठी कृष्णाने जो अग्नी प्रकट केला तो अग्नी म्हणजे विरह अग्नी तो अग्नी प्रकट करून कामदेवला गोपीकेच्या ह्दयात बंदीस्त करुन जाळले जेथे माझे वास्तव्य तु आला ना मग आता घे चटके 

विरह अग्नीमध्ये कामदेव थरफडायला लागला कामदेवाला वाटले शंकराने एकदाच जाळले हा कृष्ण तर मला रोजच जाळतो मनुष्याने ही त्याचा क्रोधाचा व द्वेषाचा कामदेव असाच जाळला पाहीजे कृष्ण हे त्यागाचे प्रतीक आहे कृष्णाचे चरीत्र मनुष्याने आत्मसात केले पाहीजे गोपीकेसाठी कृष्ण एक मित्र होता गोपीकासमोर ञासदायक अनेक लिला केल्या पण गोपीकांनी त्याचा |स्विकार केला 

सर्व साधनांत श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे. पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखर भगवत्‌कृपाच पाहिजे. आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय, आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे, आणि देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा.

योगात, योग करीपर्यंतच समाधान असते; पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधान असते. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणे, नाद ऐकणे, या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या ? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वांभूतीं पाहणे ही निर्गुण उपासनाच होय. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा; केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे; म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. नामाचे साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग होय. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. जगदगुरु तुकाराम महाराज याची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली; याचा अर्थ असा की, त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. गाडी उताराला लागली की जशी अतिवेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय.

सद्यस्थितीत सनातन धर्मावर अनेक आक्रमण होत आहे गोर गरीबांना धर्मातरा सांठी प्रलोभने देऊन त्याना भरकट वण्याचे काम चालू आहे त्यासाठी आपण एक संघ राहीले पाहीजे गाईवर प्रेम करा तीचा सांभाळ करा तीला जपा

गेल्या सात दीवसापासून चालू असलेल्या या सप्ताहची सांगता महाप्रसादाने झाली श्री संत सेवा तरूण मंडळ व ग्रामस्थानी यावेळी चोख व्यवस्था ठेवली दहा हजार भावीकांनी यावेळी प्रसाद घेतला

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....