176 गावच्या वॉटर ग्रीड मधील मधील, सर्व गावांना एका महिन्याच्या आत पाणी सुरू करा कुठलीही सबब ऐकून घेणार नाही- माजी मंत्री आमदार बबनराव लोणकर,ग्राम पातळीवर आयुष्यमान भारत योजनेतील गोल्डन कार्ड साठी कॅम्प आयोजित करा,परतुर नगरपालिकेचे अधिकारी आमदार लोणीकरांच्या प्रश्नावर चिडीचूप


प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
176 गावच्या वॉटर ग्रीड मधील पाणी मार्च महिन्यापर्यंत सर्व गावापर्यंत पोहोचवा कुठेही अडचण आली ती सोडवण्यासाठी आपण समर्थ असून स्वतःला झोकुन देऊन काम करा व काम पूर्ण करा असा सज्जन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वॉटर ग्रीड अधिकाऱ्यांना भरला
 176 गावची वॉटर बीड मधील योजनेचे पाणी सर्व गावापर्यंत पोहोचवताना 120 गावाच्या विस्तारित योजनेतील कामे परीने पूर्ण करा खऱ्या अर्थाने पाण्याची टंचाई असणारा तालुका म्हणून मंठा तालुका कडे पाहिले जाते त्यामुळे या तालुक्यातील कामे अगोदर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी दिल्या
नेर शेवली भागातील 58 गावातील कोळवाडी येथील मुख्य जल कुंभातून पाणी सोडण्यासाठी तयारी करून या ठिकाणचे पाणी 58 गावांना सोडण्याचे नियोजन करा असे यावेळी बोलताना लोणीकरांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले
   पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की निम्न दुधना प्रकल्पांतर्गत शेती पोहोच रस्त्याचे गेल्या दोन-तीन वर्षापासून केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पडून असून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करा काम करा शेतकऱ्यांना आपल्या शेतात पिकणारा हळद ऊस कापूस ज्वारी बाजरी फळ फळावर आधी पिके बाजारात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी हे रस्ते न झाल्यामुळे होतात त्यामुळे हलगर्जीपणा सोडून कामाला प्राधान्य द्या नसता परिणाम वाईट होतील असा इशारा उपस्थित अधिकाऱ्यांना दिला
नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या कामासंदर्भामध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या बैठकीमध्ये समाधान व्यक्त केले मात्र हे काम आणखी जोमाने करावे लागेल योजने समाविष्ट असलेल्या गावांची मुदत लवकरच संपणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करा असे यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले
     पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात एसटी बसची सेवा ही गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाने बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र ध्यानात घेऊन ज्या ज्या ठिकाणी बस सोडणे शक्य आहे त्या त्या ठिकाणी बस सोडावी असे यावेळी सांगितले
यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर नगरपालिकेचा आढावा घेत असताना नगरपालिकेला मागील आर्थिक वर्षांमध्ये किती निधी प्राप्त झाला होता व त्याचा व्हिडिओ कसा झाला असा प्रश्न विचारतात अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आणि त्यांना कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही त्यामुळे लोणीकर अधिकच आक्रमक झाले, पालिकेसाठी येणारा निधी हा जनतेचा पैसा असून जनतेला किमान काय पायाभूत सुविधा पण दिल्यात एवढी माहिती नगरपालिका प्रशासनाला नसेल तर पालिका पालिकेसाठी ही शरमेची बाब असल्याचे यावेळी बोलताना आमदार लोणीकर यांनी नमूद केले
यावेळी पशु विभाग पिक विमा दुष्काळी अनुदान व इतर विभागांचा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आढावा घेतला
यावेळी तहसीलदार रूपा चित्र गटविकास अधिकारी कदम कार्यकारी अभियंता रबडे वीज वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख बैठकीला उपस्थित होते

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....