ग्रामीण भागातील तरुणांमध्ये कलांगुण सादर करण्याची जिद्द - गौतम सदावर्ते

तळणी प्रतिनीधी रवी पाटील 
जिल्हा परिषद प्राथमीक शाळा तळणी येथे दि.13-02-2023 रोजी वार्षिक स्नेह सन्मेलन (सांस्कृतिक) कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमामध्ये शालेय बालचिमुकल्यांनी उस्फुर्त असा सहभाग घेत गावक-यांची मने जिंकली...
   या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी श्री.जे.डी.इंगळे सर सेवानिवृत शिक्षक तसेच आदर्श शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.श्री.जे.डी.इंगळे सरांनी जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी या शाळेतुन सेवानिवृत होत असतांना आपली आठवण म्हणून दोन संगणक संच शाळेला भेट म्हणून दिले.
 या  कार्यक्रमाचे उदघाटक ग्रामपंचायत तळणीचे सरपंच गौतम सदावर्ते,.विश्वनाथ  चंदेल उपसरपंच सर्व सदस्य, व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत  
      या प्रसंगी सरपंच गौतम सदावर्ते यानी विद्यार्थाना मार्गर्शन केले कलेचे सादरीकरण करते विध्यार्थी स्वःतचे सर्वस्व पणाला लावतात त्याच प्रमाने विद्यार्थानी अभ्यासात सुध्दा कष्टाने लक्ष दिले पाहीजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये आजही कलागून सादर करण्याची मोठी जिद्द आहे गरज आहे ती व्यासपीठाची मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यानी आपल्या अभ्यासाचा वेळ वाया न घालवत्ता ती कला सादर केली पाहीजे कला ही मनुष्याचा एक दागीना आहे तो सतत चमकत राहतो मेहनत करून कलेचा दागीना विद्यार्थ्यानी चमकवत ठेवला तर एक कलेचा पर्याय भविष्यासाठी कामी येतो असे ग्रामीण भागातील अनेक शाळामधून अनेक गूणी विद्यार्थी पूढे येत एक दहा वर्षापूर्वीचा कालखंड आपण बघीतला तर एवढे साधने उपलब्ध नव्हती जि पच्या शाळा सुध्दा एक चांगला कार्यक्रम घेऊ शकतात यावरून हे सिध्द होते असे प्रतिपादन सरपंच गौतम सदावर्ते यानी शेवटी केले 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन   गारोळे सर,. वराडे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक  खंदारे सर यांनी मानले.
  सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शालेय व्यवस्थापन समीती,शालेय सर्व शिक्षकवृंद व गावातील काही होतकरु शिक्षणप्रेमी यांनी सहकार्य केले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....