पत्रकार धुमाळ यांना पितृशोक
दि.२२ - तालुक्यातील शेवगा येथील जेष्ठ नागरिक तुळशीदास किसनराव धुमाळ यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर परतूर शहरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार आशिष धुमाळ त्यांचे चिरंजीव होत.