सर्वांगीण विकासाच्या बाबतीत माझा परतुर विधानसभा मतदार संघ राज्यात एक नंबर ला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन ,भारतीय जनता पक्ष घनसावंगी विधानसभा पूर्ण ताकतीने लढणार - आमदार लोणीकर

जालना प्रतिनिधी समाधान खरात 
उच्चस्तरीय तज्ञांची टीम तयार करून इजराइल सारख्या प्रगत राष्ट्राचे अभ्यास दौरे करून मराठवाडा वॉटर ग्रीड योजना परतूर मतदार संघात यशस्वीपणे राबवली असून मतदार संघात पिण्याचे शुद्ध पाणी घराघरात पोहोचवले आहे. त्यामुळे परतूर मतदारसंघातील खेड्यापाड्यात गाव गाड्यात फक्त बारा रुपयात 1000 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी गोरगरीब सर्वसामान्य जनतेला मिळत असून लवकरच ही योजना मराठवाड्यातील सर्व तालुक्यात यशस्वीपणे राबविण्याचा आपला मानस असून त्या करिता आपण प्रयत्न करणार आहोत. असे प्रतिपादन लोकप्रिय लोकनेते मराठवाडा वाटर ग्रीड योजनेचे जनक माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी घनसावंगी मतदार संघातील रांजणी येथे परतुर ते रांजणी रस्त्याच्या मजबुतीकरण खडीकरण व डांबरीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. 
   यावेळी बोलताना आमदार लोणीकर पुढे म्हणाले की राज्यातील नागरिकांना रस्त्यावर शौचालयास जावे लागत होते राज्यातील महिलांच्या मुलींच्या सन्मानाचा प्रश्न होता, महिलांच्या मुलींच्या मनात संकुचित भावना निर्माण होत होती स्वच्छता खात्याचा कारभार आपल्याकडे असल्याने राज्यभरात घराघरात एक कोटी स्वच्छतागृह बांधून महाराष्ट्र राज्यातील सर्व गाव, वाड्या वस्तीत आपण हागणदारी मुक्त योजना यशस्वीपणे राबवल्याने महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त केले. याबरोबरच शेगाव पंढरपूर दिंडी मार्गा सह जालना परभणी महामार्ग अशा मोठमोठ्या रस्त्यांच्या बांधकामा करता निधी खेचून आणत जालना जिल्ह्यात रस्त्यांचं जाळ निर्माण केलं. जिल्ह्यात विजेचा प्रश्न गंभीर होता 16 ते 18 तासाचे लोड शेडिंग असायचं त्याकरिता आपण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अनेक मोठमोठ्या वीज केंद्राकरिता तसेच उप वीज केंद्राकरिता निधी खेचून आणत जिल्ह्यात गाव गाड्यात खेड्यापाड्या तांड्यावर वाड्या वस्तीवर जागोजागी शेत शिवारात नवीन ट्रांसफार्मर बसवून विजेचे जाळे निर्माण केल. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे असताना फक्त मतदारसंघाचा विकास करायचा ही संकुचित भावना न बाळगता जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण अविरत प्रयत्न केला. परतुर शहराच्या विकासाकरिता 350 कोटी रुपयांचा निधी आपण आणल्याने, परतूर शहरात समाधानकारक विकास काम केल्याने परतुर येथे रेल्वे लाईन जवळ 46 कोटी रुपयांच्या उडान पुलाचे आपण लोकार्पण केले असल्याने परतूर शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचा सर्वे केल्यास माझा परतुर विधानसभा मतदारसंघ हा राज्यात एक नंबरचा विकासित मतदार संघ असेल असे वक्तव्य यावेळी आमदार लोणीकरांनी आवर्जून केले. यावेळी व्यासपीठावर नानासाहेब देशमुख सतीशराव घाडगे सुनील बापू आर्दड रमेश महाराज वाघ प्रकाशराव टकले संजयजी तौर अंकुशराव बोबडे श्रीमंतराव पोकळे सर्जेराव जाधव शामराव देशमुख विजय वरखडे प्रभाकर देशमुख सर्जेराव जाधव खालिद भाई सुदर्शन जाधव गोविंद ढेंबरे उपस्थित होते.
  पुढे बोलताना घनसावंगी विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण प्रयत्नशील असून भारतीय जनता पक्ष येणारी विधानसभा निवडणूक घनसावंगी विधानसभा मतदारसंघ पूर्ण ताकतीने लढणार असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटन मजबूत करण्याकरता अविरत सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी आमदार लोणीकरांनी दिल्या.
 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खालील भाई सुदर्शन जाधव सुरेश उगले सुभाषराव देवडे अर्जुनराव पडेवार हरीश पाटोळे सचिन पाटोळे किरण गुडेकर हरीश पाटोळे सुनील शेंडगे राम भालेराव सुंदर बप्पा जाधव यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी गावातील व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....