शेलगाव शिवारात देशी दारूच्या २४ बाटल्या पकडल्या, आष्टी पोलिसांची कारवाई


परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 परतूर तालुक्यातील सेलगाव ते गणेशपुर जाणाऱ्या रोडवर सेलगाव शिवारात देशी दारुच्या २४ बाटल्या ताब्यात बाळगुन चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असतांना आष्टी पोलिसांनी पकडून दुचाकी जप्त करून कारवाई केली आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी कि संशयित अशोक रामचंद्र पवार, रा. रंगोपंत टाकळी हा दि २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मौजे सेलगाव ते गणेशपुर जाणाऱ्या रोडवर सेलगाव शिवारात सोळाशे अंशी रुपये किमतीची एका वायरच्या पिशवी मध्ये देशी दारुच्या २४ सिलबंद बाटल्या तसेच वीस हजार रुपये किमतीची मोटार सायकल क्र. एमएच २१ ए.के.३५७० वर एकुण २१ हजार ६८० रुपयाच्या. अशोक पवार यांनी विना परवाना बेकायदेशिर रित्या प्रोव्हिशन गुन्ह्याचा माल देशी दारुच्या २४ बाटल्या ताब्यात बाळगुन चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मोटार सायकलवर घेऊन जात असताना मिळुन आला. या प्रकरणी पोकॉ गणेश शिंदे यांच्या फिर्यादी वरून आष्टी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ जे.डी पालवे हि करीत आहेत. या कारवाईने अवैध देशी दारू विक्री व वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात